Home मराठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांविरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलन, दादरमध्ये सेनेचा मोर्चा

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांविरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलन, दादरमध्ये सेनेचा मोर्चा

539

कर्नाटकातील बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान केल्याने राज्यात सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटत असून ठिकठिकाणी निदर्शने, आंदोलने करण्यात येत आहेत. मुंबईत शिवाजी पार्कात शिवसैनिकांकडून रविवारी (१९ डिसेंबर) आंदोलन करण्यात आले. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावरून आक्रमक झालेल्या शिवसेनेने त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडो मारत आंदोलन केले. या वेळी शिवसैनिक आणि पोलिसांत झटापटही झाली.

कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार आहे, पण देशाच्या देवाचा अपमान होतो आणि कोणतीही कारवाई होत नाही. कानडी बांधव महाराष्ट्रातही आहेत. त्यांना इथे त्रास दिला जात नाही. शाळा बंद केल्या जात नाहीत. तुम्ही आता तुमच्या सरकारला सांगा नाही तर तुमचं महाराष्ट्रात राहणं कठीण होईल,’ असा इशारा खासदार अरविंद सावंत यांनी दिला आहे. या घटनेचा वाशी येथेही सर्वपक्षीय संघटना आणि मराठा संघटनांनी एकत्र येत निषेध नोंदवला. या वेळी शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. शनिवारी शिवसेनेने भाजप प्रदेश कार्यालसमोर आंदोलन केले होते. त्यानंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता.

कोल्हापूर| छत्रपती शिवाजी महाराज, संगोळ्ळी रायण्णा, राणी चन्नम्मा या थोर व्यक्ती होत्या. त्यांचा आपण गौरव केला पाहिजे. त्यांच्या नावाचा वापर करून समाजात दुही निर्माण करणे चुकीचे आहे, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हुबळी येथे सांगितले. कुठल्याही प्रकारचा हिंसाचार सरकार खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. बोम्मई म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, संगोळ्ळी रायण्णा, राणी चन्नम्मा हे महान देशभक्त आहेत. परकीय आक्रमणांपासून त्यांनी देशाला सुरक्षित ठेवले, असेही ते म्हणाले.

बेळगावात सोमवारी (२० डिसेंबर) सकाळी सहा वाजेपर्यंत लागू असलेले १४४ कलम अर्थात जमावबंदीचा आदेश आता बुधवारी सकाळी ६ पर्यंत लागू राहणार असल्याची माहिती पोलिस आयुक्तालयाने दिली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी ही खबरदारीची उपाययोजना करण्यात आली आहे. बेळगावात आधीच कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या घटना शांतता भंग करू शकतात. यासाठी ही काळजी घेण्यात येत आहे.

Previous article#Nagpur | कुमार विश्वास की कविताओं ने नागपुरवासियों का दिल जीता
Next article#Nagpur | ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबला, कारने तरुणाला चिरडलं, काळजाचा ठोका चुकवणारी दृश्यं
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).