Home Nagpur #Nagpur | ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबला, कारने तरुणाला चिरडलं, काळजाचा ठोका चुकवणारी दृश्यं

#Nagpur | ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबला, कारने तरुणाला चिरडलं, काळजाचा ठोका चुकवणारी दृश्यं

483

नागपूर ब्युरो : कार रिव्हर्स घेताना वाहन चालकाने बाळगलेली निष्काळजी रस्त्यावरील तरुणाला चांगलीच महागात पडली. ड्रायव्हरने ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबल्यामुळे पार्किंगमधून गाडी बाहेर काढताना ती जोरदार वेगाने मागे आली आणि कारने एकाला चिरडलं. यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला आहे, तर दोघे जण थोडक्यात बचावले. नागपुरात घडलेली ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात मुख्य रस्त्यावर ही घटना घडली आहे. मेन रोडच्या जवळच संबंधित चारचाकी गाडी पार्क करण्यात आली होती. ड्रायव्हर ती काढण्याचा प्रयत्न करत असताना हा भीषण अपघात झाला.

नेमकं काय घडलं?

संबंधित चालक पार्क केलेली पांढऱ्या रंगाची कार बाहेर काढत होता. त्याने गाडी रिव्हर्समध्ये घेतली. यावेळी ब्रेकवर पाय ठेवण्याऐवजी ड्रायव्हरने अ‍ॅक्सिलरेटरवर पाय ठेवला. त्यामुळे पार्किंगमध्ये असलेली गाडी रिव्हर्समध्ये जोरदार वेगाने आली.

एक जण गंभीर, दोघे बचावले

यावेळी बाजूलाच असलेल्या सार्वजनिक बाकड्यावर तीन युवक मोबाईल बघत बसले होते. यातील दोघांनी प्रसंगावधान राखत तिथून पळ काढला, मात्र एक जण त्यात अडकला आणि कारच्या धक्क्याने गंभीर जखमी झाला. त्यानंतरही कार फिरुन दुसऱ्या बाजूला जाऊन थांबली.

ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. परिसरातील व्यक्ती आवाज ऐकून धावत अपघातस्थळी पोहोचली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोणाच्याही काळजात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.

Previous articleकर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांविरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलन, दादरमध्ये सेनेचा मोर्चा
Next articleशेअर बाजारात मोठी घसरण:सेन्सेक्स 1100 अंकांनी घसरून 55907 वर
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).