Home Nagpur #Nagpur | मुंबईतील घटनेची नागपुरात पुनरावृत्ती! चार चालकाने वाहतूक पोलिसाला फरफटत नेलं

#Nagpur | मुंबईतील घटनेची नागपुरात पुनरावृत्ती! चार चालकाने वाहतूक पोलिसाला फरफटत नेलं

545

नागपूर ब्युरो : नागपुरात (Nagpur) एका कार (Car) चालकानं वाहतूक पोलिसाला (traffic police) चक्क गाडीवरुन ओढत फरफटत नेल्याचा प्रकार समोर आला आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात (Camera) कैद झाली आहे. कार चालकावर कारवाई करत असताना बेशिस्त कार चालकानं वाहतूक पोलिसाच्या अंगावरच गाडी घातली. बोनेटवर बसलेल्या या पोलिसाला कार चालकानं वेगान फरफटत नेलंय. मात्र थोडक्यात वाहतूक पोलिसाचा यातून जीव वाचलाय. मात्र जिवाची पर्वा न करता कार चालकासमोर पोलिसानं दाखवलेल्या धाडसाचंही कौतुक केलं जातंय.

कारवाईदरम्यान काय घडलं?

नागपूरच्या रामदासपेठ भागातील कॅनल रोड इथं वाहतूक पोलीस कारवाई करत होते. त्यावेळी एका कारला थांबवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं. मात्र चालकांनं गाडी न थांबवता पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार चालकाला अडवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. तेव्हा पोलिसालाही न घाबरता कार चालकानं पोलिसाच्या अंगावरच गाडी घातली.

यानंतर संतापलेल्या काही जागृक नागरिकांनी कारचा दुचाकीनं आणि कारनं पाठलाग गेला. त्यानंतर कार चालकाला गाडी थांबवणं भाग पाडलं. अखेरीस कार चालकाची गाडी थांबल्यानंतर वाहतूक पोलिसाला गाडीच्या खाली उतरवण्यात आलं. दोघांनी दुचाकीवरुन कारला ओव्हरटेक करत ब्लॉक केलं आणि पर्यायानं कार चालकांना गाडी थांबवण्याशिवाय पर्याय उरला नाही. यानंतर कार चालकावर पोलिसांनी कायदेशीर कारवाईदेखील केली. कार चालकाला ताब्यात घेण्यात आलं असून पोलीस याप्रकरणी आता पुढील कारवाई करत आहेत.

मुंबईतही घडलेला असाच प्रकार!

दरम्यान, इकडे मुंबईतही वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवर बसवून नेल्याप्रकऱणी कार चालकाला अटक करण्यात आली होती. ऑक्टेबर महिन्याच्या सुरुवातीलाच ही घटना समोर आली होती. मुंबईत अंधेरीतील डी. एन. नगर परिसरात हा प्रकार घडला होता. गाडी न थांबवल्याने वाहतूक पोलीस कारच्या बोनेटवर चढला. तरी चालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवरुनच फरफटत पुढे नेलं होतं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

Previous articleनगर जिल्ह्यात मुख्याध्यापकासह 5 विद्यार्थी कोरोनाबाधित; प्राथमिक शाळा 23 पर्यंत बंद
Next article#Wardha | वडील श्वानाने रक्तदान करून वाचविले सात महिन्यांच्या पिल्लाचे प्राण
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).