Home कोरोना नगर जिल्ह्यात मुख्याध्यापकासह 5 विद्यार्थी कोरोनाबाधित; प्राथमिक शाळा 23 पर्यंत बंद

नगर जिल्ह्यात मुख्याध्यापकासह 5 विद्यार्थी कोरोनाबाधित; प्राथमिक शाळा 23 पर्यंत बंद

370

पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर या शाळेतील विद्यार्थ्यांची कोरोना तपासणी केली असता शाळेतील पाच विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. मुख्याध्यापकासह पाच विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्याने शिक्षण विभागाने गुरुवारपर्यंत (२३ डिसेंबर) ही शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

कोरोना महामारीनंतर प्राथमिक शाळा सुरू होत असतानाच दोन दिवसांपूर्वी डमाळवाडी येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांचीही कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यात १५ विद्यार्थ्यांचा अहवाल निगेटिव्ह, तर ५ अहवाल पॉझिटिव्ह आले. मुख्याध्यापकासह ५ विद्यार्थ्यांची तब्येत ठणठणीत असली तरी शिक्षण विभागाने सुरक्षेच्या कारणास्तव २३ डिसेंबरपर्यंत येथील जिल्हा परिषद शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले.

Previous articleमुंबई -दिल्ली 12 तासात प्रवास, नितीन गडकरी यांची महत्वकांक्षी योजना
Next article#Nagpur | मुंबईतील घटनेची नागपुरात पुनरावृत्ती! चार चालकाने वाहतूक पोलिसाला फरफटत नेलं
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).