Home Covid-19 आणखी 7 जणांना ओमायक्रॉनची लागण, राजस्थानातील एकाच कुटुंबातील 9 सदस्यांना नव्या व्हेरिएंटची...

आणखी 7 जणांना ओमायक्रॉनची लागण, राजस्थानातील एकाच कुटुंबातील 9 सदस्यांना नव्या व्हेरिएंटची लागण; देशात एकूण 18 प्रकरणे

460
देशात रविवारी एकाचवेळी ओमायक्रॉनचे 18 प्रकरणे आढळून आली आहे. यामध्ये राजस्थानमध्ये सर्वाधिक 9 रुग्ण आहेत. ते सर्व एकाच कुटुंबातील आहेत. यापैकी 4 नुकतेच दक्षिणेतून परतले होते. या चौघांच्या संपर्कात आलेल्या आणखी 5 जणांमध्ये ओमायक्रॉनची पुष्टी झाली आहे. यापूर्वी पुणे आणि त्याच्या लगतच्या पिंपरी चिंचवड जिल्ह्यातील 7 जणांमध्ये नवीन व्हेरिएंट आढळून आला होता. दिल्लीतही एका रुग्णाला याची लागण झाल्याचे समोर आले आहे. यासह, देशातील 5 राज्यांमध्ये या व्हेरिएंटची 22 प्रकरणे समोर आली आहेत.

याआधी रविवारी सकाळी दिल्लीत ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला होता. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले की, बाधित हा टांझानियामधून आला होता. विमानतळावर तपासणी केल्यानंतर त्याला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे सांगण्यात आले. त्याला दिल्लीतील LNJP रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आता देशात नवीन प्रकाराची एकूण 12 प्रकरणे आहेत. आधी दिल्ली आणि पिंपळी चिंचवड, बंगळुरू, मुंबई आणि जामनगर.

राजस्थानचे कुटुंब दक्षिण आफ्रिकेतून परतले होते

25 नोव्हेंबर रोजी राजस्थानमधील संक्रमित कुटुंबातील 4 सदस्य दक्षिण आफ्रिकेतून दुबई आणि मुंबईमार्गे जयपूरला पोहोचले. येथे त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले. त्याचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. हे कुटुंब राजस्थान आरोग्य विज्ञान विद्यापीठात (RUHS) भरती आहे. यामध्ये आई-वडिलांसह दोन मुलांचा समावेश आहे.

LNJP रुग्णालयाचे एमडी सुरेश कुमार यांनी सांगितले की, रुग्णालयात दाखल असलेल्या ओमायक्रॉन रुग्णामध्ये घशात सूज, थकवा आणि अंगदुखी ही लक्षणे दिसत आहेत. संक्रमित व्यक्तीने लसीचे दोन्ही डोस घेतले होते, त्यामुळे त्याच्यावर फक्त सौम्य लक्षणे दिसत आहेत. यापूर्वी शनिवारी ओमायक्रॉनला गुजरातमधील जामनगरमध्ये संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. त्याचवेळी, मुंबई आणि बंगळुरूमधील ओमायक्रॉनच्या प्रकरणांसह, देशात या प्रकाराचे एकूण 5 संक्रमित आढळले आहेत.

देशातील ओमायक्रॉनचे शेवटची 4 प्रकरणे
  • कर्नाटक : कर्नाटकात गुरुवारी सर्वप्रथम दोन रुग्ण आढळून आले. त्यापैकी एक परदेशी आहे, जो नोव्हेंबरमध्ये भारतात आला होता.
  • गुजरात : गुजरातमधील जामनगर शहरात तिसरे प्रकरण समोर आले आहे. ओमायक्रॉनची लागण झालेली आढळलेली व्यक्ती 28 नोव्हेंबर रोजी झिम्बाब्वेहून जामनगरला आली होती.
  • महाराष्ट्र : भारतातील ओमायक्रॉनचे चौथे प्रकरण शनिवारी महाराष्ट्रात आढळून आले. मुंबईजवळील कल्याण डोंबिवलीत राहणारा हा माणूस दक्षिण आफ्रिकेतून परतला होता.
    देशात येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन गाइडलाइन्स

ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटबाबत वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर आजपासून आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवीन गाइडलाइन्स लागू करण्यात आली आहे. केंद्राने 28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. जोखीम असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. निकाल लागेपर्यंत प्रवाशांना विमानतळावर थांबावे लागणार आहे. सर्व विमानतळांवर अतिरिक्त RT-PCR सुविधांची व्यवस्था केली जाईल.

फॉर्ममध्ये सांगावी लागेल ट्रॅव्हल हिस्ट्री

‘हाय रिस्क’ देश वगळता इतर देशांतील प्रवाशांना विमानतळाबाहेर जाण्याची परवानगी असेल. त्यांना 14 दिवस सेल्फ मॉनिटरिंग करावे लागेल. ज्या देशांना ओमायक्रॉनच्या धोक्याच्या श्रेणीतून वगळण्यात आले आहे, तिथून येणाऱ्या प्रवाशांपैकी 5% प्रवाशांची निश्चितपणे चाचणी केली जाईल. यानुसार, आता सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना हवाई सुविधा पोर्टलवर उपलब्ध असलेल्या सेल्फ-डिक्लेरेशन फॉर्ममध्ये फ्लाइटमध्ये चढण्यापूर्वी 14 दिवसांचा प्रवास इतिहास द्यावा लागेल.

Previous article#NAGPUR | ओमायक्रॉनवर आत्ताच काही बोलणे हे रहस्यकथेसारखे होईल : डॉ . गंगाखेडकर
Next article#Nagpur | शारजाह से आई फ्लाइट के सभी यात्रियों की आरटी-पीसीआर निगेटिव
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).