Home Maharashtra #Maharashtra । एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी आजचा मोठा दिवस, पगारवाढीसंदर्भात महत्वाची बैठक, तोडगा निघणार?

#Maharashtra । एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी आजचा मोठा दिवस, पगारवाढीसंदर्भात महत्वाची बैठक, तोडगा निघणार?

449

मुंबई ब्युरो : एसटी महामंडळाच्या विलीनीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत एसटी कामगारांना अंतरिम वेतनवाढ देण्याचा पर्याय देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज 11 वाजता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे. आजचा दिवस हा एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा असून, या बैठकीमध्ये संपावर तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान त्यापूर्वी मंगळवारी आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि एसटीचे प्रतिनिधी यांच्यामध्ये तब्बल दोन तास बैठक झाली.

याबाबत माहिती देताना अनिल परब यांनी म्हटले आहे की, कोर्टाने विलीनीकरणाचा विचार करण्यासाठी समिती नेमली आहे. समितीचा जो काही अहवाल येईल तो आम्ही मान्य करू. पण तोपर्यंत संप चालू राहू शकत नाही. त्यामुळे कामगारांना अंतरिम वेतनवाढ देण्याचा पर्याय दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांसोबत सकारात्मक चर्च झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान आज अकरा वाजता होणाऱ्या बैठकीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मंगळवारी अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करत असलेल्या भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, गेले काही दिवस एसटीचा संप सुरू आहे. कर्मचाऱ्यांनी एसटीच्या विलीनीकरणाची मागणी लावून धरली आहे. या मागणीबाबत तिढा कायम होता. कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांच्यासोबत चर्चा झाली. सविस्तर चर्चा झाली. वेतन वेळेवर मिळावे. वेतन वाढावं अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. उच्च न्यायालयाने समिती बनवली आहे. समितीकडे सध्या हा विषय आहे.

12 आठवड्यात अहवाल द्यायचा आहे. अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्री तो कोर्टात सादर करतील, कोर्टाच्या आदेशाचं कोणीच उल्लंघन करू शकत नाही. कामगारांना जे जे हवं आहे ते आम्ही देत आहोत. एका बाजूने समितीची प्रक्रिया सुरू आहे. याला बराच कालावधी लागणार आहे. तिढा कायम राहू नये, यासाठी कर्मचाऱ्यांना अंतरिम वेतनवाढीचा पर्याय दिला आहे. दरम्यान याच संदर्भात आज पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यामध्ये आज बैठक होणार आहे.

कामगारांनी अधिक ताणू नये. सरकार दोन पावलं पुढे यायला तयार आहे. तुम्ही दोन पावलं मागे या. चर्चेने मार्ग निघत असतो. एसटी सेवा ठप्प असल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा असे आवाहन देखील परब यांनी केले आहे.

Previous articleसरकार अपने इमरजेंसी रिजर्व से 50 लाख बैरल तेल रिलीज करेगी, 3 रुपए तक कम हो सकते हैं दाम
Next articleकेंद्रीय मंत्रिमंडल आज कृषि कानून निरस्त विधेयक 2021 को देगा मंजूरी, शीतकालीन सत्र में होना है पेश
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).