Home हिंदी मेडिकल आणि मेघे हॉस्पिटलला नितीन गडकरींतर्फे 400 पीपीई कीट

मेडिकल आणि मेघे हॉस्पिटलला नितीन गडकरींतर्फे 400 पीपीई कीट

739

नागपूर  : नागपुरात कोरोनाची वाढत असलेली संख्या ही चिंतेची बाब ठरली आहे. असे असले तरी आरोग्य विभागाच्या डॉक्टर आणि कर्मचार्‍यांना मात्र रुग्णांची सेवा करावीच लागते. ही सेवा करताना त्यांनाही कोरोना विषाणूपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शालिनीताई मेघे हॉस्पिटल वानाडोंगरी या दोन्ही हॉस्पिटलला प्रत्येकी 200 पीपीई कीट मदत म्हणून दिले.
आज सकाळी ना. गडकरी यांच्या निवासस्थानी या पीपीई कीटचे वाटप करण्यात आले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. मंगेश फडनाईक यांनी 200 पीपीई कीट स्वीकारले. यावेळी त्यांच्यासोबत डॉ. दर्शन दक्षिणदास उपस्थित होते. श्रीमती शालिनीताई मेघे हॉस्पिटल आणि रीसर्च सेंटर वानाडोंगरी या हॉस्पिटलतर्फे आमदार आणि रुग्णालयाचे संचालक समीर मेघे यांनी 200 पीपीई कीट स्वीकारले. याप्रसंगी त्यांच्यासोबत विशेष कार्य अधिकारी सयाजी जाधव उपस्थित होते.