Home Maharashtra #Maharashtra । उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा, 2 लाखांवर भाविक...

#Maharashtra । उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा, 2 लाखांवर भाविक दाखल

475

सोमवारी पंढरपुरात कार्तिक यात्रा सोहळा संपन्न होत असून कोरोना आणि एसटीच्या संपामुळे ही यात्रा प्रभावित झाली होती मात्र यात्रेसाठी जवळपास दोन लाखांवर भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज पहाटे विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मानाचा वारकरी म्हणून कोंडीबा देवराव टोणगे व पत्नी प्रयागबाई कोंडीबा टोणगे (रा. निळा, सोनखेड, ता.लोहा, जि.नांदेड)या दापत्याची निवड झाली.

पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी उपमुख्यमंत्र्यांचे श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिरात आगमन झाले.सुरुवातीला श्री विठ्ठलाची आणि त्यानंतर श्री रुक्‍मिणी मातेची षोडशोपचार पूजा करण्यात आली. सत्काराप्रसंगी प्रारंभी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी आमदार समाधान आवताडे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, प्रांत अधिकारी गजानन गुरव, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड तसेच सदस्य उपस्थित होते.

अजित पवार कार्तिक एकादशीला महापूजेस आले आहेत, मात्र त्यांचे समर्थक तेवढ्यावर समाधानी दिसत नाहीत. ते मुख्यमंत्री व्हावेत, अशी भावनाच समर्थकांनी व्यक्त केली आहे. कारण आषाढीच्या शासकीय महापूजेचा मान मुख्यमंत्र्यांना तर कार्तिकीच्या महापूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांना असतो. रायुकॉँचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी ‘बा विठ्ठला! कार्तिकीची महापूजा घडली कैकदा! आषाढी महापूजेस यावा माझा दादा!’ असे डिजिटल बॅनर शहरात लावले आहे.

#Maharashtra । महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

Previous article#Maharashtra । महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन
Next article#Tariq Anwar । विहिंप, बजरंग दलावर बंदी का आणू नये? तारीक अन्वर यांचा सवाल
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).