Home Nagpur #Nagpur । नागपुरात निघाला पोलिसांचा रूट मार्च, शांतता राखण्याची अपील

#Nagpur । नागपुरात निघाला पोलिसांचा रूट मार्च, शांतता राखण्याची अपील

454

नागपूर ब्युरो : शनिवार, दिनांक 13/11/2021 रोजी सायंकाळी नागपूर पोलिसांनी शहरातील प्रमुख आणि व्यापार क्षेत्रात रुट मार्च काढला. मेश्राम पुतळा चौक पो. स्टे. सदर येथून पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक 2 विनिता साहू यांचे उपस्थितीत शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यास आवाहन करण्यासाठी 1 एसीपी , पोलीस स्टेशन सीताबर्डी, सदर, धंतोली, मानकापूर , गिट्टीखदान, अंबाझरी येथील 7 पोलीस निरीक्षक, 18 अधिकारी, 60 पोलीस अमलदार आणि नागपूर शहरातील दंगा नियंत्रक पथक, जलद प्रतिसाद पथक , वाहतूक विभाग यांचे सह फ्लॅग मार्च घेऊन पीए सिस्टम द्वारे आवाहन करण्यात आले.

सदर रूट मार्च मेश्राम पुतळा चौक येथे सुरू होऊन मंगळवारी बाजार गड्डी गोदाम , एल आय सी चौक, आरबीआय चौक , झीरो माईल, धंतोली मार्केट परिसर, धरमपेठ, गोकुल पेठ, अंबाझरी, गिट्टीखदान मानकापूर हद्दीतून पुन्हा मेश्राम पुतळा चौक येथे रूट मार्च काढण्यात आला.

#Gadchiroli | गडचिरोलीत पोलिस, नक्षलींमध्ये चकमक; 26 नक्षलवाद्यांचा खात्मा

Previous articleNagpur | नागपुरात पोलिसांचा रूट मार्च
Next article#T20WC2021 | आज मिलेगा नया टी-20 वर्ल्ड चैंपियन, ऑस्ट्रेलिया-न्यूजीलैंड में होगा वर्ल्ड कप का फाइनल मुकाबला
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).