Home Vidarbha #chandrapur | शिकारचा पाठलाग करताना शेतातील विहिरीत पडलेल्या वाघाची अखेर झाली सुटका,...

#chandrapur | शिकारचा पाठलाग करताना शेतातील विहिरीत पडलेल्या वाघाची अखेर झाली सुटका, बेशुद्ध न करताच काढले बाहेर

648
चंद्रपूर ब्युरो : जिल्ह्यातील एका गावात शिकारचा पाठलाग करताना एक वाघ चक्क शेतात घुसला. तसेच एका विहिरीत पडला. बाहेर निघता नाही आल्याने तो रात्रभर तेथेच अडकला. वरोरा तालुक्यात असलेल्या आल्फर रस्त्यावरील गमन शिरपाते या शेतकऱ्याच्या शेतात रविवारी रात्री ही घटना घडली. या घटनेची माहिती सकाळपर्यंत वाऱ्यासारखी पसरली. यानंतर घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली.

वन विभागाला याची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. तसेच मदतकार्य करण्यास सुरुवात केली. परंतु, बघ्यांची मोठी गर्दी असल्याने सुरुवातीला बचावकार्यात अडथळे येत होते.मात्र, रेस्क्यू टीमने शर्थीचे प्रयत्न करून अखेर वाघाला सुखरूप बाहेर काढले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोखाळा येथील सरपाते यांच्या शेतातील विहीरीत वाघ पडला. यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर वरोरा वनपरिक्षेत्र अधिकारी / कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम खाट ला दोरे बांधून विहिरीमध्ये सोडले. यावर वाघ येताच त्याला थोडे वर घेण्यात आले. यानंतर वाघ स्वतः उडी मारून बाहेर पडला आणि पुन्हा जंगलाच्या दिशेने निघून गेला. वाघ निघताच गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला.

या टीममध्ये एमपी राठोड -वनपरिक्षेत्र अधिकारी, अमोल इ नेवारे, किशोर देऊळकर -क्षेत्र सहाय्यक, निबुद्धे, रामटेके- वनपाल, एसडी वाटेकर, ईश्वर लाडके वनरक्षक -आपस संस्था (NGO) वरोरा व वनमजूर, चौकीदार उपस्थित होते.

#Nagpur । नागपूरला त्वरित संपर्कमंत्री द्या, प्रदेश राष्ट्रवादीची प्रफुल पटेल यांना मागणी

Previous article#Nagpur । नागपुरात पत्रकार सहनिवासाच्या नाल्यात मगरीचा मुक्काम, वेणा नदीतून मगर आली असल्याचा अंदाज
Next article#PadmaAwards2020 | अरुण जेटली और सुषमा स्वराज को मरणोपरांत पद्म विभूषण, कंगना को पद्मश्री
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).