Home Nagpur #Nagpur । नागपूरला त्वरित संपर्कमंत्री द्या, प्रदेश राष्ट्रवादीची प्रफुल पटेल यांना मागणी

#Nagpur । नागपूरला त्वरित संपर्कमंत्री द्या, प्रदेश राष्ट्रवादीची प्रफुल पटेल यांना मागणी

551

नागपूर ब्युरो : नागपूरला त्वरित संपर्कमंत्री द्यावे अशी मागणी खासदार प्रफुल पटेल यांना करण्यात आली. दिवाळीच्या खास पर्वावर गोंदिया येथे त्यांची भेट घेऊन वरील मागणीचे निवेदन त्यांना सादर करण्यात आले. तसेच या प्रसंगी त्यांना दिवाळीच्या खास शुभेच्छाही देण्यात आल्या.

गेल्या काही महिन्यांपासून नागपूर शहराला संपर्कमंत्री नसल्यामुळे राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय समित्या रखडलेल्या आहेत. आगामी महानगरपालिका निवडणूक बघता विविध समित्या जाहीर होणे आवश्यक असून त्या माध्यमातून महानगर पालिकेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळेल आणि पक्षाची ताकद वाढेल असे मनोगत प्रदेश चिटणीस दिलीप पनकुले यांनी व्यक्त केले.

प्रदेश सरचिटणीस माजी आमदार दीनानाथ पडोळे यांनी खा. प्रफुल पटेल साहेब हे स्वतः या समस्येकडे लक्ष देत असल्यामुळे शहरात पक्ष संघटनेला बळ मिळाले आहे. प्रदेश उपाध्यक्ष कामगार नेते बजरंगसिंह परीहार यांनी पटेल साहेबांच्या माध्यमातून कामगारांचे अनेक प्रश्न सुटलेले असून त्यांनीच नागपूर शहराचे पालकत्व स्वीकारावे असे मत मांडले. याप्रसंगी खासदार प्रफुल पटेल यांनी नागपुरात मी जातीने लक्ष देत असून नागपुरातील समस्या सोडविण्याकरिता मी सदैव पक्षासोबत आहे असा ठाम विश्वास व्यक्त केला.

आपल्या महत्त्वपूर्ण मागणीचे त्वरित निराकरण करण्यात येईल असे आश्वासन दिले.
ह्या प्रसंगी माजी आमदार व नागपूर शहराचे निरीक्षक राजेंद्र जैन यांची सुद्धा भेट घेऊन याबाबत त्यांना अवगत करण्यात आले. त्यांनीही सकारात्मक सहकार्य करण्याचे भरीव आश्वासन दिले. याप्रसंगी प्रदेश पदाधिकारी जानबा मस्के, शहर पदाधिकारी संजय शेवाळे, सरदार रवींद्र मुल्ला, सोपानराव शिरसाट, लालाजी नागपुरे उपस्थित होते.

#Bollywood | रजनीकांत की नई फिल्म अन्नाथे ने 4 दिन में 174 करोड़ रुपए का किया कलेक्शन