Home हिंदी कोरोना चा प्रकोप रोखण्यासाठी तज्ञांची चमू शुक्रवारी नागपुरात : गृहमंत्री देशमुख

कोरोना चा प्रकोप रोखण्यासाठी तज्ञांची चमू शुक्रवारी नागपुरात : गृहमंत्री देशमुख

नागपूर : नागपूर शहरात व ग्रामीण भागात कोरोनाची रुग्ण संख्या ही वेगाने वाढत आहे. धारावी व कोळीवाडा सह मुंबईतील इतर भागातील कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी ज्या तज्ञांनी उपायोजना केल्या त्यांना 4 सप्टेंबरला नागपूर येथे घेऊन येऊन विभागीय आयुक्त कार्यालय येथे दुपारी 12.30 वाजता नागपूरच्या परिस्थितीचा आढावा घेणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

यात मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांचासह डॉ. हेमल शहा Nephrologist, डॉ. राहुल पंडीत Intensivist, डॉ. मुफज्जल लकडावाला General Surgeon, डॉ. गौरव चतुर्वेदी ENT यांच्यासह इतर तज्ञांचा समावेश आहे. पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

ज्या पद्धतीने धारावी व कोळीवाडासह मुंबईतील इतर भागात कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांनी प्रयत्न केले त्याच धर्तीवर त्यांचा अनुभव घेऊन नागपुरात काय उपाय योजना कराव्या लागतील याची चर्चा या बैठकीत होणार आहे. या तज्ञांनी ज्या पद्धतीने मुंबई येथे कोरोनाची परिस्थिती हाताळली त्याच पद्धतीने नागपूर येथील परिस्थिती कशी हाताळायची यावर ते मार्गदर्शन करणार असल्याची माहिती सुद्धा अनिल देशमुख यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here