Home Maharashtra Uddhav Thackeray । प्रबोधनकार ठाकरे यांनी लावलेले विचारांचे बीज आज मोठे वटवृक्ष...

Uddhav Thackeray । प्रबोधनकार ठाकरे यांनी लावलेले विचारांचे बीज आज मोठे वटवृक्ष झाले आहे

559

मुंबई ब्युरो : मुंबई वाचक प्रेरणा दिनाचे औचित्य साधत ज्येष्ठ लेखक प्रबोधनकार ठाकरे यांच्या लेखांचा संग्रहाचं प्रकाशन झालं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात भाषण करताना मुख्यमंत्र्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या धर्माविषयी असलेल्या भावनेवर भाष्य केलं. तसेच आपल्या आजोबांनी लावलेले विचारांचे बीज आज मोठे वटवृक्ष झाले असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रत्येकाने आपापला धर्म पाळावा, पण घराबाहेर पडताना आपला देश हाच एक धर्म असला पाहिजे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

‘…तर मी कडवट हिंदू म्हणून उभा राहीन’

“प्रत्येकाला धर्म आहे. पण माणूस आधी माणूस म्हणून जन्माला येतो. त्यानंतर जात-पात धर्म त्याला चिपकवली जातात. मग काय करायचं? नास्तिकच व्हायचं का? नाही, अजिबात नाही. तुम्ही धर्म जरुर पाळा. धर्माचं पालन जरुर करा. पण तो सर्व अभिमान आपापल्या घरात ठेवा. घराबाहेर पडताना हा देश माझाच धर्म हीच धारणा असली पाहिजे. ही भावना घेऊन घराबाहेर पडल्यानंतर कुणी त्याच्या धर्माची मस्ती होऊन माझ्यासोबत उभा राहिला तर मग मला एक कडवट देशाभिमानी, राष्ट्रभिमानी हिंदू म्हणून त्याच्यासमोर उभं राहण्याशिवाय पर्याय नाही. मी कडवट हिंदू म्हणून उभा राहीन”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
  1. आयुष्यातील अनुभवाच्या गोष्टी आम्हाला सांगितली. त्यातून आमची जडणघडण झाली. कालच दसरा झालेला आहे. मला काय बोलायचं ते मी बोललेलो आहे. ते बोलताना हेही मी सांगितलंय, हे जे शब्दांचे धन आहे, प्रबो’धन’ ते माझ्याही पेटाऱ्यात आहे. पण काही वेळेला बोलण्याचं धाडस, कारण लोकशाहीत मत लागतं, त्यासोबत धाडसही लागतं. मत नाही मिळालं तरी चालेल, पण हिंमत पाहिजे.
  2. तुम्ही म्हणाल हे शंभर वर्षांपूर्वीचं जुनं आहे, आता काय करायचं? त्याचं महत्त्व काय? पण तसं नाहीय. महत्त्व असेल-नसेल. हे बघणाऱ्यावर आहे. शंभर वर्षापूर्वीचा काळ कसा होता हे त्यातून कळतं. पण त्या काळामध्ये सुद्धा ज्या काही वाईट रुढी-परंपरा होत्या, त्या मोडण्यासाठी तेव्हाच्या लोकांनी काय केलंय, मग आपण काय करायला पाहिजे हे कळण्यासाठी या साहित्याचं महत्त्व आहे.
  3. मी साहित्यिक वगैरे नाही. जे काही आपण संत तुकारामांच्या बाबतीत ऐकतो. त्यांच्या पोथ्या पाण्यात टाकल्या होत्या. पण त्या परत पाण्यावर तरंगल्या होत्या. मला तोच क्षण आता वाटतोय. कारण आमच्यासाठी याच पोथ्या आहेत. या पोथ्या वाचल्या नसल्या तरी त्या रक्तामध्ये आलेल्या आहेत.
  4. आता पितृपक्ष होऊन गेला. पितृपक्ष चांगला की वाईट? पितृपक्षात चांगलं काम करु नये, असं बोलतात. मला ज्यावेळी कुणी विचारतं अमूकतमूक काम करु नको का? मी विचारतो का? ते म्हणतात पितृपक्ष आहे. पण मी त्यावर म्हणतो अहो माझा पक्षच पितृ’पक्ष’ आहे. वडिलांनी स्थापन केलेला आहे. वडिलांनी स्थापन केलेला पक्ष तो पितृपक्ष नाही का? त्यामुळे हे सगळे भोंदुगिरी आहे.
  5. माझे आजोबा नास्तिक होते का? तर नाही. त्यांची देवीवर प्रचंड श्रद्धा होती. पण हे जे ढोंग आहे ना त्या ढोंगावर लात मार. ढोंग नकोय. ती लात मारणं बोलून फक्त सोडून दिलं नाही. त्याबाबतीत त्यांना खरंतर मोठा फुटबॉल पटूच बोलावं लागलं. कारण जिथे ढोंग दिसलं तिथे त्यांनी लाथ मारली. त्यांनी टीका केल्यानंतर घरावरती कचरा टाक सारखे अनेक त्रास ते भोगत-भोगत आले आहेत. तिथून ते मोठे झाले.
  6. एकाकी माणूस, संघटन वगैरे नाही. पण तेव्हा त्यांनी जी विचारांची बिजे पोहोचली ते एवढे फोफावली की, ते चित्र तुम्ही सगळीकडे बघत आहात.
  7. मुख्यमंत्री पद हा एक बहुमान आहे. ते नक्कीच आहे. पण माझ्या आजीची म्हणजे बाळासाहेबांच्या आजीची त्यावेळेची इच्छा होती की, बाळासाहेबांनी सरकारी नोकरी करावी. त्यावेळेचा काळ वेगळा होता. स्वातंत्र्याच्या आधीचा काळ. आजही परिस्थिती तशीच आहे म्हणा. नोकरीची शाश्वतीच नाहीय. शाश्वत नोकरी कोणती ? तर सरकारी नोकरी. मी माझ्या मनात विचार करतोय. माझ्या आजीच्या काय भावना असतील? कारण जिची इच्छा माझ्या वडिलांनी गव्हर्मेंट सर्व्हेंट व्हावे. त्यांनी काय केलं हे सारं जगाने बघितलं आहे. आणि नातू तर आज जो आहे तो तुमच्या समोर आहे. या सगळ्या घटना कोण घडवतो, कशा घडतात, या काही कळत नाही. कोणी कुठे जन्म घ्यायचा, कुणाच्या खांद्यावर कोणती जबाबदारी द्यायची हे घडवणारं कुणीतरी नक्कीच असतं.

Nitin Gadkari | प्रधानमंत्री गति शक्ति योजना देश के सर्वांगीन विकास के लिए महत्वपूर्ण

Previous articleNitin Gadkari | प्रधानमंत्री गति शक्ति योजना देश के सर्वांगीन विकास के लिए महत्वपूर्ण
Next articleभारतीय नौसेना कमांडर कॉन्फ्रेंस | 18 से 22 अक्टूबर के बीच दिल्ली में आयोजित होगा सम्मेलन
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).