Home Bollywood Bollywood News । आता अक्षय कुमार दिसणार ‘गोरखा’मध्ये, पोस्टर रिलीज करत दिली...

Bollywood News । आता अक्षय कुमार दिसणार ‘गोरखा’मध्ये, पोस्टर रिलीज करत दिली बातमी

484

मुंबई ब्युरो : अभिनेता अक्षय कुमारने आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याच्या पुढील चित्रपटाचे नाव ‘गोरखा’ (Gorkha) असणार आहे. आपल्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करताना अक्षय कुमारने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर लिहिले की, “कधीकधी तुमच्यासमोर इतक्या प्रेरणादायी कथा येतात की, तुम्हाला त्यांच्यावर चित्रपट बनवायचा असतो. असाच एक चित्रपट महान गुरखा युद्ध नायक मेजर जनरल इयान कार्डोझोच्या जीवनावर आधारित असेल.’ अक्षयने नुकताच आनंद एल रॉयसोबत त्याच्या एका रक्षाबंधन चित्रपटाचे चित्रीकरण दिल्लीत पूर्ण केले. अक्षय कुमार आनंद एल रॉयसोबत ‘गोरखा’ चित्रपटातही काम करणार आहे.

अक्षय कुमार वर्षातून किमान दोन ते तीन चित्रपट करतो. कधीकधी ते अगदी 4 पर्यंत पोहोचते. पण ‘गोरखा’ या चित्रपटांपेक्षा थोडा वेगळा असणार आहे. पोस्टर पाहून तुम्ही समजू शकता की, हा चित्रपट देशभक्तीने परिपूर्ण असेल. चित्रपटाची कथा भारतीय लष्कराच्या गोरखा रेजिमेंटचे मेजर जनरल इयान कार्डोझो यांच्या जीवनावर आधारित आहे. अक्षय कुमारचा ‘गोरखा’ हा चित्रपट संजय पूरन सिंह चौहान दिग्दर्शित करणार आहे. तर त्याच्या निर्मितीची सर्व जबाबदारी आनंद एल राय यांची असेल.

Bollywood News | आर बाल्की की क्रिकेट पर बेस्ड फिल्म में नजर आएंगे अभिषेक बच्चन

Previous articleNagpur News । कामठीत लवकरच बुद्धिस्ट थीम पार्कचा प्रकल्प राबवू, देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
Next articleMaharashtra | गुन्ह्यांचा तपास आता अधिक जलदगतीने, अचूकतेने होणार; पीएसआय होण्याचे हवालदारांचे स्वप्न आता पूर्ण होणार
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).