Home Business Maharashtra Band । 11 ऑक्टोबरचा महाराष्ट्र बंद यशस्वी करा : महाविकास आघाडी

Maharashtra Band । 11 ऑक्टोबरचा महाराष्ट्र बंद यशस्वी करा : महाविकास आघाडी

696

नागपुर ब्युरो : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांना भाजपाच्या योगी सरकार कडून चिरडून टाकल्याच्या घटनेचा संपूर्ण देशभरात सर्व स्तरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे. देशातील शेतकऱ्यांवर भाजपच्या केंद्र सरकार कडून व भाजपशासित राज्य सरकारकडून सातत्याने अन्याय अत्याचार होत आहे, भाजप सरकारचे हे कृत्य हिटलर व मुसोलिनी लाही लाजवेल अशा प्रकारचे असून लखीमपूर खीरी येथील शेतकऱ्यांना सामूहिक रित्या ठार मारण्याची घटना जनरल डायर ने केलेल्या हत्याकांड ची आठवण करून देणारी आहे, अशा या क्रूर अत्याचारी भाजप सरकार विरोधात संपूर्ण देशभर आंदोलने सुरू आहेत, राज्यातील महा विकास आघाडी सरकारने देखील सोमवार दिनांक 11 ऑक्टोंबर 2021 रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे, या बंद ला यशस्वी करण्याचे आवाहन महाविकास आघाडी तर्फे करण्यात आले आहे.

सोमवारला आयोजित करण्यात आलेल्या या बंद ला यशस्वी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी स्वतः आपापली दुकाने बंद करावी असे आवाहन महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षातील नेते, पदाधिकारी यांच्यासमवेत महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी प्रयत्नरत आमदार दुष्यंत चतुर्वेदी,संपर्क प्रमुख शिवसेना नागपुर, आमदार विकास ठाकरे शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी नागपुर शहर, प्रमोद मानमोडे महानगर प्रमुख शिवसेना नागपुर,धुनेश्वर पेठे शहर अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस नागपुर शहर तर्फे करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर नागपूर बंद यशस्वी करण्यासाठी शिवसेना शहरप्रमुख नितीन तिवारी यांनी नागपुरातील नागरिक, व्यापारी, कर्मचारी आणि वाहतूकदारांना आवाहन केले आहे की, देशाच्या अन्नदात्याच्या सन्मानार्थ, त्यांच्या हक्कांसाठी, न्याय मिळवण्यासाठी बंद यशस्वी करावे. शहरातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिका तर्फे घोषित महाराष्ट्र बंद ला सफल करण्यासाठी सकाळी 10 वाजता वेरायटी चौक, बर्डी येथे एकत्रित होवून महाविकास आघाड़ी चे कार्यकर्ता नागपुर बंद यशस्वी करतील अशी माहिती नितिन तिवारी शिवसेना शहर प्रमुख नागपुर, आम.वझाहत मिर्झा,काँग्रेस, क्रांती (बाळासाहेब) कामारकर, राष्ट्रवादी, पराग पिंगळे,शिवसेना, राजेंद्र गायकवाड, शिवसेना, विश्वास नांदेकर,शिवसेना, नितीन मिर्झापुरे, प्रहार जनशक्ती, विपीन चौधरी, प्रहार जनशक्ती, सर्व जिल्हा अध्यक्ष व जिल्हा प्रमुख शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार, जनशक्ती पार्टी यांनी दिली आहे.

Previous articleMaharashtra Band । “महाराष्ट्र बंद” साठी व्यापाऱ्यांना जबरदस्ती करू नये : अश्विन प्रकाश मेहाडिया
Next articleकोळसा टंचाईचे संकट । विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणचे शर्थीचे प्रयत्न सुरु
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).