Home ganeshotsav लय भारी । स्पर्धा जिंकली म्हणून गणेश मंडळाकडून 5 महिलांना हेलिकॉप्टर राईड

लय भारी । स्पर्धा जिंकली म्हणून गणेश मंडळाकडून 5 महिलांना हेलिकॉप्टर राईड

609

पुणे ब्युरो : पुण्यातील गणेश मंडळाने आयोजित केलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार म्हणून जे देण्याची भन्नाट आयडिया केली ती सध्या पुण्यात चर्चेचा विषय बनली आहे. गणेश मंडळाच्या या स्पर्धेमध्ये एकूण पाच महिला विजयी झाल्या होत्या. या पाचही महिलांना हेलिकॉप्टरमधून सैर घडवण्यात आली. यावेळी या महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.

गणेशोत्सवामध्ये वेगवेगळ्या गणेश मंडळांकडून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. पुण्यातही एका गणेश मंडळाने गौरी -गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेमध्ये ज्या महिला विजयी होतील त्यांना थेट हेलिकॉप्टरमधून पुणे दर्शन घडवण्यात येईल, असे या गणेश मंडळाने सांगितले होते.

बऱ्याच दिवसांपूसन विजेत्या महिला हेलिकॉप्टरमध्ये बसून पुणे शहर बघण्याची वाट पाहत होत्या. विजेत्या पाच महिलांचे हे स्वप्न शेवटी साकार झाले. विजयी महिलांना हेलिकॉप्टरमधून पुणे दर्शन घडवण्यात आलंय. स्पर्धेमध्ये पाच महिला विजयी झाल्या होत्या. या पाचही महिलांना हेलिकॉप्टरमधून सैर घडवण्यात आली. यावेळी महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. हवेत उडण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. हेलिकॉप्टरमध्ये बसून आम्हाला खूप आनंद झाला, अशी भावना या महिलांनी बोलून दाखवली.

Previous articleAryan Drugs Case | मुंबई क्रूज में महाराष्ट्र के एक बहुत बड़े नेता के बेटे का करीबी? देवेंद्र फडणवीस की प्रतिक्रिया
Next articleभक्तांची गर्दी । अकोल्यातील हिरामाता म्हणजे आराध्य दैवत, परिसरात 200 वर्षांपूर्वीचे वटवृक्ष
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).