Home Social भक्तांची गर्दी । अकोल्यातील हिरामाता म्हणजे आराध्य दैवत, परिसरात 200 वर्षांपूर्वीचे वटवृक्ष

भक्तांची गर्दी । अकोल्यातील हिरामाता म्हणजे आराध्य दैवत, परिसरात 200 वर्षांपूर्वीचे वटवृक्ष

559

अकोला ब्युरो : अकोला जिल्हातील मुर्तिजापूर तालुक्यापासून 19 किलोमीटर अंतरावर जामठी गाव वसलेलं आहे. अकोला ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्र 6 वर जामठी फाटा लागतो. तेथून हे गाव अवघ्या अडीच किलोमीटर अगदी हाकेच्या अंतरावर वसलेलं आहे. या गावात हिरामातेचं पुरातन मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे विदर्भातील भक्तांचं आराध्य दैवत आहे. हे मंदिर जेवढं देखणं आहे, तेवढंणच या मंदिरातील हिरामातेची मूर्ति देखील मनाला शांती देणारी आहे. गोल आकाराच्या काळ्या पाषणात ही मूर्ती कोरलेली आहे. त्यावर चांदीचा मुकुट चढवलेला आहे. देवीचं हे मोहक रुप पाहून डोळ्याचं पारणं फिटतं.

वेगवेगळ्या कालखंडात केला गेला मंदिराचा जिर्णोद्धार

मिळालेल्या माहितीनुसार इतिहासातील वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी मंदिराचा जिर्णोद्धार केल्याची नोंद आहे. सध्या नवरात्रोत्सव सुरु झाला आहे. हिरामाता मंदिरात नवरात्रोत्सवात नऊ दिवस भक्तांच्या उपस्थीतीत महापूजा व आरती केली जाते. येथे विदर्भासद महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून भाविक दर्शनासाठी येतात. मात्र गेल्या दोन वर्षापासून कोरानाचे संकट ओढवल्याने मंदिरपरिसरात भक्तांची वर्दळ कमी आहे.

भक्तांच्या हाकेला धावून येते हिरामाता

शासनाने धार्मिक स्थळ उघडले असून सध्या येथील व्यवस्थापक तथा भक्तांकडून कोराना नियमाचे पालन केले जातेय. इथल्या हिरामाता मंदीराला शेकडो वर्षाचा इतिहास लाभला असून भक्तांच्या हाकेला धावणारी आणि भक्तांचे संकट दूर करणारी अशी जामठीच्या हिरामाताचे ओळख आहे. हे मंदिर उंच डोंगर दर्‍यात असून आजूबाजूचा परिसर हिरवळीने नटललेला आहे. या मंदिराला लागूनच एक तलाव आहे. एकंदरीत या भागात निसर्गरम्य वातावरण असून याठिकाणी 200 वर्षापूर्वीचे वटवृक्ष असल्याचेही जाणकार वृद्ध सांगतात.

Previous articleलय भारी । स्पर्धा जिंकली म्हणून गणेश मंडळाकडून 5 महिलांना हेलिकॉप्टर राईड
Next articleMaharashtra Band । महाविकास आघाडीचा आक्रमक पवित्रा, येत्या 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).