Home Bollywood केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिवांनी ॲनिमेशन, व्हीएफएक्स आणि गेमिंग, कॉमिक्स यांच्या राष्ट्रीय...

केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिवांनी ॲनिमेशन, व्हीएफएक्स आणि गेमिंग, कॉमिक्स यांच्या राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रासाठीच्या प्रस्तावित जागेला दिली भेट

429
मुंबई ब्युरो : मुंबईतील अॅनिमेशन, व्हीएफएक्स आणि गेमिंग, कॉमिक्स यांच्या राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रासाठीच्या प्रस्तावित जागेला केंद्रीय सूचना आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांनी दिलेल्या भेटीने अधिकच उर्जा दिली आहे. चंद्र यांनी त्यांच्या दोन दिवसीय मुंबई भेटीचा भाग म्हणून या केंद्राच्या कामाच्या जागेला भेट देऊन यासंबंधीच्या विविध भागधारकांशी विस्तृतपणे विचारविमर्श केला.

सचिव अपूर्व चंद्रा हे महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवा तुकडीतील अधिकारी आहेत. त्यांनी ॲनिमेशन, व्हीएफएक्स आणि गेमिंग, कॉमिक्स यांच्या प्रस्तावित राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रासाठी महाराष्ट्र सरकारने नेमून दिलेल्या फिल्म सिटीजवळच्या 20 एकराच्या जागेला भेट दिली. आयआयटी मुंबई अर्थात मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेशी सहकार्य संबंधातून माहिती आणि प्रसारण मंत्रालय हे केंद्र विकसित करत आहे. चंद्रा यांनी आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शुभाशिष चौधरी यांची भेट घेऊन तपशीलवार चर्चा देखील केली.

माहिती आणि प्रसारण सचिवांनी फिल्म सिटी संकुलातील व्हिसलिंग वुड्स आंतरराष्ट्रीय चित्रपट संस्थेला देखील भेट दिली आणि सुभाष घाई तसेच इतर मान्यवरांची भेट घेतली.मुंबईतील फायरस्कोअर इंटरॲक्टीव्ह या हायपर कॅज्युअल गेम विकास स्टुडीओ सह विविध खासगी निर्माण सुविधांना देखील भेट दिली. व्हीएफएक्स उद्योगातील तंत्रज्ञानविषयक घडामोडी जाणून घेण्यासाठी त्यांनी स्टुडीओतील विविध अधिकारी आणि तंत्रज्ञांशी संवाद साधला. त्यानंतर चंद्रा यांनी चित्रपट निर्मात्यांचे दृष्टीकोन जाणून घेण्यासाठी यश राज स्टुडीओ येथे चित्रपट आणि मनोरंजन उद्योगातील प्रमुख नेत्यांशी विस्तृत प्रमाणात चर्चा केली.

भारतीय ॲनिमेशन, दृश्य परिणाम (सामान्यपणे ज्याला व्हीएफएक्स म्हटले जाते) आणि गेमिंग उद्योग हे गेल्या दोन दशकांमध्ये उल्लेखनीय रीतीने विकसित आणि उत्क्रांत झाले आहेत. अधिकाधिक चित्रपट निर्माते आणि टीव्हीवरील कार्यक्रमांचे निर्माते जेन एक्स मधील दर्शकांसाठी व्हीएफएक्स आणि ॲनिमेशन सारख्या तंत्रज्ञानाने संचालित उत्पादनांचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार करीत असताना, या क्षेत्रात कुशल व्यावसायिकांची मागणी सतत वाढत आहे.

गेमिंग उद्योगातील भारतीय कंपन्या देखील पाश्चिमात्य गेम स्टुडीओसाठी आऊटसोर्सिंग कंपन्या म्हणून काम करण्यापासून आता गेमची संरचना आणि विकसन करणाऱ्या कंपन्यांमध्ये परिवर्तीत झाल्या आहेत. अनेकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यापासून ते अगदी तळाच्या पातळीपासून सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे आणि पुढच्या पिढीला भारतीय मूल्यांची माहिती देण्याचे माध्यम म्हणून विकसित करणे अशा मार्गांनी प्रयत्न केल्यास ॲनिमेशन, व्हीएफएक्स आणि गेमिंग, कॉमिक्स क्षेत्राला आपल्या समाजावर मोठा परिणाम साधता येईल अशी अपेक्षा आहे.

ॲनिमेशन, व्हीएफएक्स आणि गेमिंग, कॉमिक्स यांचे राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र या क्षेत्रात दर्जात्मक शिक्षणाची सोय करून आणि लहान लहान कार्यक्रमांचे आयोजन करून ही कौशल्य विषयक गरज भागवण्यावर आधारित संकल्पनेनुसार काम करत आहे. या क्षेत्रातील भारतातील तसेच जागतिक पातळीवरील कुशल व्यक्तींची गरज भागविण्यासाठी भारतात जागतिक दर्जाच्या बुद्धिवंतांचा ताफा निर्माण करण्याच्या उद्देशाने ही संस्था कार्यरत आहे.

Previous article#Maha_Metro | रीच 2 पर तेजी से आकार ले रहे हैं मेट्रो स्टेशन, रफ़्तार से जारी है निर्माण कार्य
Next articleकोविड रुग्णसेवेसाठी राज्यातील सर्व शासकीय व पालिका महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना प्रत्येकी 1 लाख 21 हजार रुपये
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).