Home ganeshotsav Nagpur News । महापौरांच्या हस्ते ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या स्वयंसेवकांचा सत्कार

Nagpur News । महापौरांच्या हस्ते ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या स्वयंसेवकांचा सत्कार

728

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या यशस्वीतेसाठी केलेल्या कार्याचे केले कौतुक

 

नागपूर ब्युरो : नागपूर महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या यशस्वीतेमध्ये महत्वाचे योगदान देणा-या ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या स्वयंसेवकांचा गुरूवारी महापौर दयाशंकर तिवारी यांनी सत्कार केला. मनपा मुख्यालयातील महापौर कक्षामध्ये ग्रीन व्हिजील फाउंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांच्यासह टिम लिडर सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर, डॉ. शितल चौधरी, श्रीया जोगे या सर्वांना महापौरांनी मनपाचा मानाचा दुपट्टा, सन्मानचिन्ह आणि तुळशीरोप प्रदान करून गौरवान्वित केले.

ग्रीन व्हिजील फाउंडेशनतर्फे दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान फुटाळा तलावावर नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासंबंधी जनजागृती करण्यात येते. नागपूर महानगरपालिकेच्या पर्यावरणपूरक गणेशोत्वाचे आवाहन प्रत्यक्षात साकारण्यासाठी फाउंडेशनतर्फे मनपाला सहकार्य करण्यात येते. यावर्षीही फाउंडेशनचे स्वयंसेवक संपूर्ण अकरा दिवस फुटाळा तलावावर सायंकाळी 4 वाजतापासून रात्री 11 वाजतापर्यंत नियमित कार्यरत होते.

Advt,

फुटाळा तलावात श्रीगणेशाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यास प्रतिबंध असल्यामुळे नागरिकांनी कृत्रिम तलावात मूर्तीचे विसर्जन करावे, निर्माल्य कलशामध्येच संकलित करावे यासाठी फाउंडेशनच्या स्वयंसेवकांद्वारे नागरिकांना आवाहन करून त्यांना विसर्जनासाठी सहकार्य करण्यात आले. ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या या कार्याचे कौतुक म्हणून महापौर दयाशंकर तिवारी संस्थेच्या स्वयंसेवकांना आमंत्रित करून त्यांचा मनपाच्या वतीने सत्कार केला.

नागपूर शहरातील सर्व तलावांमध्ये श्रीगणेशाच्या मूर्ती विसर्जनास प्रतिबंध असल्यामुळे मनपाद्वारे विविध ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय नागरिकांच्या परिसरात विसर्जनाची व्यवस्था व्हावी यासाठी फिरते विसर्जन कुंडांची सुद्धा व्यवस्था करण्यात आली. अशा स्थितीत नागरिकांकडून कुठल्याही प्रकारे नियमभंग होउ नये, निर्माल्य संकलन ते मूर्तींचे विसर्जन हे पूर्णत: पर्यावरणपूरकरितीनेच व्हावे यासाठी ग्रीन व्हिजील फाउंडेशनने महत्वाचे कार्य केले.

गणेशविसर्जनामध्ये मनपाला नेहमीच ग्रीन व्हिजील फाउंडेशनचे सहकार्य मिळत असून संस्थेच्या स्वयंसेवकांच्या परिश्रमामुळे मनपाला पर्यावरणपूरक गणेशोत्सव यशस्वी करता आला, अशा शब्दांमध्ये महापौर दयाशंकर तिवारी यांनी संस्थेच्या सर्व स्वयंसेवकांचे कौतुक केले.

Previous articleNagpur News | लता मंगेशकर को अनूठी संगीतमय बधाई, 92 गायिकाओं ने प्रस्तुत किए 92 एकल गीत
Next articleSchool Reopen | नागपुर में कड़ी शर्तों के साथ 4 अक्टूबर से खुलेंगे स्कूल, आदेश जारी
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).