Home Food Nagpur Food Junction । “एपिक्योर” खवय्यांसाठी खास मेजवानीचे नागपूरच्या मनीषनगरातील न्यू डेस्टिनेशन

Nagpur Food Junction । “एपिक्योर” खवय्यांसाठी खास मेजवानीचे नागपूरच्या मनीषनगरातील न्यू डेस्टिनेशन

809

नागपूर ब्युरो : राज्याची उपराजधानी नागपूरची बरीच वैशिष्ट्ये आहेत. त्यातील एक म्हणजे नागपूरकर पक्के खवय्ये आहेत. मग ते व्हेज असो की नॉनव्हेज, साउथ इंडियन असो की नॉर्थ इंडियन, चायनीज असो की मंचूरियन. याच आशयाने नागपूरच्या एका शिक्षित उद्यमी तरुणाने नागपूरकरांच्या जिभेची चव लक्षात घेऊन त्यांना हवं जिन्नस पदार्थांपासून ते पंच पक्वान्नांपर्यंत, सकाळच्या न्याहारी पासून तर रात्रीच्या भोजना पर्यंत त्यांना देण्याचा मानस केला आहे. या हरहुन्नरी तरुणाचे नाव किर्ती कुमार उर्फ अरमान शिवहरे आहे.

नागपुरातून एमबीए चे धडे गिरविल्यानंतर स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याच्या जिद्दीने आयटी पार्क परिसरात 2018 मध्ये 65 प्रकारच्या चहा तयार करून त्याने आपली सूनक दाखविली होती. त्यानंतर शहराचा विस्तार झालेल्या व न्यू नागपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनीष नगर मध्ये “Teavolution- Tea redefine” त्याने सुरू केले. लोकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन एक असं व्यासपीठ तयार करावं, ज्यात तरुणांपासून तर सिनियर्स पर्यंत देखील सर्वजण आनंद लुटू शकतील. अशी भन्नाट संकल्पना त्याच्या डोक्यात आली आणि त्यातूनच 18 ऑगस्ट 2021 रोजी एपिक्योर फूड प्लाझा (Epicure Food Plaza) सुरू झाले आहे. 10000 चौरस फूट जागेवर या फूड प्लाझा चे निर्माण करण्यात आले आहे. ज्यामध्ये लहान मुलांपासून थोरांपर्यंत सगळ्यांचा विचार करण्यात आला आहे.

अरमान यांनी आत्मनिर्भर खबर डॉट कॉम शी बोलताना सांगितले की नागपूर शहरामध्ये एक असं युनिक कन्सेप्ट तयार व्हावं, ज्यामध्ये घरातील प्रत्येक व्यक्तीला त्याचा स्पेस मिळावा, उत्तमातून उत्तम स्वादिष्ट जेवणाचा आनंद लुटता यावा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल किंवा त्यांच्या बजेटमध्ये असावं म्हणून एपिक्योर फूड प्लाझा (Epicure Food Plaza) निर्माण करण्यात आले आहे. इथे किड्स झोन, कॅफेटेरिया, लॉज, रूफ टॉप लॉन, डायनिंग हॉल आदींचा समावेश आहे.

महत्त्वाचे म्हणजे इथे जगातील 16 विविध प्रकारच्या जेवणाचा आस्वाद खवय्यांना घेता येईल. ज्यामध्ये विविध प्रकारचे व्हेज आणि नॉनव्हेज स्नॅक्स आणि जेवण, साऊथ व नॉर्थ इंडियन, हैदराबादी बिर्याणी पासून लखनवी चिकन पर्यंत, पाणीपुरी पासून रसमलाई पर्यंत, चाट, पावभाजी, बर्गर, पिझ्झा, सँडविच, मोमोज, चायनीज, इटालियन, तंदूर, शेक्स, वेफर्स, इंग्लिश ब्रेकफास्ट आणि चहा, कॉफी इत्यादींचा समावेश आहे.

इथले नयनरम्य वातावरण व वास्तू आपल्या मनाला भिडून जाण्यासारखे आहे. एकदा तरी आपण सहपरिवार एपिक्योर फूड प्लाझा (Epicure Food Plaza) ला भेट देऊन येथील विविध खाद्यपदार्थांचे आस्वाद अवश्य घ्या. अधिक माहितीसाठी निवारा को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी, अंडरपास रोड, मनिष नगर किंवा 8793486690 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

Previous articleInternet Blackout । आत्ताच तपासून घ्या आपली उपकरणे नाही तर उद्यापासून इंटरनेट सेवा होणार बंद
Next article‘गुलाब’ के बाद ‘शाहीन’ | फिर नए चक्रवाती तूफान ने बढ़ाई चिंता, गुजरात-महाराष्‍ट्र के लिए अलर्ट
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).