Home Social Nagpur News Bulletin । लॉंगमार्च प्रणेते प्रा.जोगेंद्र कवाडे यांची प्रकृती स्थिर, अँजियोप्लास्टीद्वारे...

Nagpur News Bulletin । लॉंगमार्च प्रणेते प्रा.जोगेंद्र कवाडे यांची प्रकृती स्थिर, अँजियोप्लास्टीद्वारे यशस्वी शस्रक्रिया

649

नागपूर ब्युरो : लॉंगमार्च प्रणेते आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (पीरिपा) राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांची प्रकृती स्थिर असून ते उपचाराला उत्तम प्रतिसाद देत असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि कवाडे सर यांचे पुत्र जयदीप कवाडे यांनी दिली आहे. शनिवारी प्रकृती अस्वस्थतेमुळे प्रा.कवाडे सरांना रामदासपेठ येथील नामांकित अरनेजा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. विविध तपासण्याअंती मिळालेल्या निष्कर्षानंतर ह्रदयातील ब्लॉकेजेसमुळे प्रा.कवाडे सरांवर अँजियोप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

डॉ. जसपाल अरनेजा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांची एक विशेष टीम प्रा.कवाडे यांच्या उपचार करीत आहे. शस्त्रक्रियेनंतर प्रा.कवाडे यांची प्रकृती स्थिर असून पुढील उपचारांना ते उत्तम प्रतिसाद देत आहेत. लवकरच ते संघटना कार्यात नव्या ऊर्जेने रूजू होती, अशी माहिती जयदीप कवाडे यांनी दिली आहे. असंख्य कार्यकर्ते,पदाधिकारी तसेच संघटनेचे प्रेम आणि आशिर्वाद सरांच्या पाठिशी असल्याने ते लवकर ठणठणीत बरे होतील, असे जयदीप कवाडे म्हणाले.

99 टक्के ब्लॉकेएज

रुग्णालयात दाखल केल्यानंतर सर्वप्रथम अँजियोग्राफी करण्यात आली. यात 99 टक्के ब्लॉकेएज आढळून आल्याचे समाजताच डॉ. जसपाल अरनेजा यांनी जयदीप कवाडेंशी चर्चा करून अँजियोप्लास्टी शस्त्रक्रिया करण्याचे सुचिवले.
=====================================================

कर्तृत्वशून्य स्वाभिमानी घोडा’ कवितासंग्रहाचे प्रकाशन

कवी देवेंद्र मनगटे यांचा आकांक्षा प्रकाशन तर्फे प्रकाशित ‘कर्तृत्वशून्य स्वाभिमानी घोडा’ या कवितासंग्रहाचे विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात कविवर्य श्री. बबन सराडकर यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या प्रकाशन सोहळ्याला प्रा.श्रीकांत पाटील हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यावेळी कवितासंग्रहावर प्रसिद्ध समीक्षक डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी भाष्य केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुधीर मोते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विनोद राऊत यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्राध्यापक प्रवीण सोनटक्के यांनी व्यक्त केले.

या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी कवितासंग्रहावर भाष्य करताना डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी “कविता हा आत्मशोधाचा प्रवास असतो. कवीचं व्यष्टी समष्टीशी नातं असतं. ह्या कवितेत आत्मस्वर प्रभावीपणे व्यक्त झालेला आहे. जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारी ही कविता समाजाचं वास्तव चित्रण करते” असे आपले मत मांडले. प्रास्ताविकपर भाषणात डॉ. सुधीर मोते यांनी भविष्यात हा कवितासंग्रह ‘लंबी रेस का घोडा’ ठरेल असे आपले मत व्यक्त केले. कवी देवेंद्र मनगटे यांनी मनोगतात आपला आजवरचा काव्यप्रवास आणि कवितासंग्रहाच्या शीर्षकाचा उलगडा केला.

============================================

ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान तर्फे 1 आक्टोबरला ज्येष्ठांचा मेळावा

ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान, नागपूर तर्फे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना निमित्त, येत्या 1 आक्टोबर रोजी सायंकाळी ज्येष्ठांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी केन्दीय मंत्री नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे म्हणून तर ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील,अशी माहिती प्रतिष्ठानचे सचिव डॉ राजू मिश्रा यांनी एका पत्रका द्वारे दिली आहे.

माजी आमदार डॉ गिरीश गांधी, माजी आमदार प्रा. अनील सोले, माजी आमदार अशोक मानकर, माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी महापौर श्रीमती नंदाताई जिचकार, आणि सहकार नेते बाबुराव तिडके उपस्थित राहतील. कार्यक्रमात दत्ता मेघे यांच्या तर्फे मातोश्री वृध्दाश्रम, अदास, पंचवटी वृध्दाश्रम, नागपूर, ज्ञान ज्योती अंध विद्यालय, हिंगणा, साई आश्रम, एम आय डी सी, आणि विमलाश्रम, नागपूर येथील निवासी लोकांना ना. गडकरी यांच्या हस्ते भरघोस मदत करण्यात येणार आहे. तसेच प्रतिष्ठान सोबत संलग्न झालेल्या ज्येष्ठ नागरिक मंडळांना प्रमाण पत्राचे वितरण करण्यात येणार आहे.

ज्येष्ठ नागरिक मित्रांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन प्रतिष्ठान चे सचिव डॉ राजू मिश्रा आणि सर्व ट्रस्टी प्रतापसिंह चव्हाण, अविनाश घुशे, प्रभाकर येवले, बाळ कुळकर्णी, महमूद अंसारी, कमलेश राठी, निलेश खांडेकर आदींनी केले आहे.

Previous articleCurrent Topic । डिजिटल मीडिया आणि नवा माहिती तंत्रज्ञान कायदा
Next articleChandrapur । महाराष्ट्रातील काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर यांनी स्वत: जमिनीवर बसून महिलेला दिली खुर्ची
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).