Home Woman Nagpur News । नागपूर जिल्ह्यात येत्या मंगळवारी महिला लसीकरण दिवस राबवणार :...

Nagpur News । नागपूर जिल्ह्यात येत्या मंगळवारी महिला लसीकरण दिवस राबवणार : पालकमंत्री डॉ. राऊत

488

नागपूर ब्युरो : नागपूर जिल्ह्यामध्ये येत्या 21 सप्टेंबरला महिला लसीकरण दिवस राबविण्यात येणार आहे. महानगरपालिका क्षेत्र व जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रावर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या सूचनेवरून ही मोहीम राबविली जाणार आहे.

जिल्हाधिकारी विमला आर. यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 21 सप्टेंबर रोजी नागपूर महानगर व नागपूर ग्रामीण भागात महिलांना लसीकरणासाठी विशेष सोय केली जाणार आहे. यासंदर्भात नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी देखील सर्व आरोग्य यंत्रणेला ही विशेष मोहीम राबविण्याची सूचना केली आहे. जिल्हाधिकारी विमला आर.यांनीही ग्रामीण भागात ही मोहीम सक्रियपणे राबविण्याबाबत निर्देशित केले आहे.

कोरोना संदर्भात तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन सज्ज होत असताना घराघरातील महिला व त्यांचे आरोग्य संरक्षित राहावे यासाठी ही विशेष मोहीम पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या सूचनेनुसार राबविण्यात येत आहे. यामुळे महिला स्वतः सुरक्षित होतील, कुटुंब सुरक्षित राहील आणि समाज सुरक्षित राहील.

यासाठी जिल्ह्यातील 330 लसीकरण केंद्रांवर मंगळवारी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील 160 तर ग्रामीण भागातील 180 केंद्राचा सहभाग आहे.

मंगळवारचा दिवस महिलांचा विशेष दिवस असेल, घरात काम करणाऱ्या महिला असो, शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या महिला असोत, मजूर, कामगार, घरकाम करणाऱ्या महिला असोत. त्यांनी या विशेष मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी केलेले आहे. तरी या संधीचा समस्त महिला जगताने लाभ घ्यावा,असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जिल्हाभरातील महिला बचत गट, महिला संघटना, वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या महिला संघटक, सर्व महिला या मोहिमेत हिरीरीने सहभागी होतील, अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Previous articleभारताचे अमृत महोत्‍सवी वर्ष । तेजस्विनी ग्रुपच्‍या आठ स्‍वतंत्र आण‍ि सक्षम मह‍िला करणार भारत परिक्रमा
Next articleवैक्सीनेशन का वर्ल्ड रिकॉर्ड | देश में एक दिन में ढाई करोड़ से ज्यादा लोगों को वैक्सीन लगाने का बना इतिहास
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).