मुंबई ब्युरो : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याच्या घरी सलग तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाचा सर्व्हे सुरू आहे. आयकर विभागाचे अधिकारी बुधवारपासून (15 सप्टेंबर) सातत्याने सोनूच्या घराची आणि कार्यालयाची चौकशी करत आहेत. बुधवारनंतर, अभिनेत्याच्या घरी गुरुवारी देखील तपास करण्यात आला, आता ही तपासणी आज म्हणजेच शुक्रवारीही जारी आहे.
आयटी अधिकाऱ्यांना हिशोबात मोठ्या प्रमाणात हेरफेर सापडला आहे. हा व्यवहार बॉलिवूड आणि सोनू सूदच्या वैयक्तिक आर्थिक पेमेंटशी संबंधित आहे. ‘सूद चॅरिटी फाउंडेशन’च्या खात्यांचीही आता चौकशी केली जाणार आहे. अहवालानुसार, आयटी विभाग आज संध्याकाळी प्रेसद्वारे या संदर्भात निवेदन देईल.
तिसऱ्या दिवशीही तपास सुरूच
सोनू सूदचे घर आणि कार्यालयासह त्याच्याशी संबंधित 6 ठिकाणी आयकर विभागाची कारवाई अजूनही सुरूच आहे. आयकर विभागाची ही कारवाई सलग तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. बातमीनुसार, आयकर विभागाला या छाप्यात अभिनेत्याविरोधात कर चुकवल्याचे सबळ पुरावे सापडले आहेत.
असे म्हटले जात आहे की, सोनूला चित्रपटांमधून मिळालेल्या शुल्कामध्ये कर अनियमितता पाहायला मिळाली आहे. या अनियमिततांनंतर आता आयकर विभाग सोनू सूदच्या चॅरिटी फाउंडेशनच्या खात्यांचीही चौकशी करेल. आज अर्थात 17 सप्टेंबर रोजी या संपूर्ण प्रकरणावर आयकर विभागाकडून निवेदन जारी केले जाऊ शकते. सोनूवर ज्याप्रकारे सातत्याने कारवाई केली जात आहे, त्यावरून हे स्पष्ट होते की सोनूच्या अडचणी खूप वाढणार आहेत.
हिशोबात गडबडीची शंका
हा छापा नाही, किंवा आयकर विभागाने सोनू सूदच्या कोणत्याही ठिकाणाहून काहीही जप्त केलेले नाही. बातमीनुसार, आयकर विभागाने बुधवारी अभिनेत्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी पाहिनी केली होती, कारण अभिनेत्याशी संबंधित अकाऊंट बुकमध्ये गडबड झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. आयकर विभागाने अभिनेत्याशी संबंधित सहा ठिकाणी सर्वेक्षण केले होते. पण, आज ज्या प्रकारे अधिकारी पुन्हा अभिनेत्याच्या घरी पोहोचले आहेत.