Home Crime Nagpur News । ईडी, सीबीआयच्या पाठोपाठ आता इन्कम टॅक्सकडूनही अनिल देशमुखांवर धाडी

Nagpur News । ईडी, सीबीआयच्या पाठोपाठ आता इन्कम टॅक्सकडूनही अनिल देशमुखांवर धाडी

नागपूर ब्युरो : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर पुन्हा एकदा छापेमारी करण्यात आली आहे. सकाळी 11.30 वाजता आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर, मुंबई, तसंच त्यांच्या मालकीच्या कॉलेजवर आयकर विभागाने छापे ठाकले. नागपुरातील निवासस्थान, नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील निवासस्थान, मुंबईतील ज्ञानेश्वरी निवासस्थान, NIT कॉलेजवर आयकर विभागाने छापा टाकून झाडाझडती केली.

अनिल देशमुख सध्या नागपुरात नाहीत. यापूर्वी दोन वेळा ईडी आणि सीबीआयने धाडी टाकल्या होत्या. आता दिल्ली आणि मुंबई येथील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकून चौकशी सुरु केली आहे.

देशमुखांशी संबंधित ठिकाणी टाकलेल्या धाडी

पहिली धाड: 25 मे 2021
25 मे 2021 रोजी ईडीने सर्वात पहिली धाड टाकली होती. नागपूर येथील शंकर नगर, छावणी भाग आणि जाफर नगर या ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर शिवाजी नगर भागातील हरेकृष्ण अपार्टमेंटमध्ये धाड टाकण्यात आली होती. ही कारवाई प्रामुख्याने सागर भटेवार यांच्याशी संबंधित ठिकाणी करण्यात आली होती. सागर भतेवार हे अनिल देशमुख यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

दुसरी कारवाई: 25 जून 2021
या दिवशी ईडीने आठ ठिकाणी टाकल्या होत्या. या धाडी थेट अनिल देशमुख यांच्यावर होत्या. अनिल देशमुख यांचं वरळी सुखदा इमारतीतील घर, ज्ञानेश्वरी बंगला त्याच प्रमाणे त्यांच्या एका कार्यलयावर धाड टाकण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे सेक्रेटरी संजीव पालांडे, कुंदन शिंदे यांच्याशी संबंधित ठिकाणीही धाडी टाकण्यात आल्या होत्या. याच कारवाईत पालांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक करण्यात आली होती. या कारवाईवेळी देशमुख यांचा जबाब नोंदवण्यात आला होता.

तिसरी कारवाई: 2 जुलै 2021
2 जुलै रोजी ईडीने तिसऱ्यांदा अॅक्शन घेतली. अनिल देशमुख यांना समन्स देण्यासाठी ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी गेले होते. मात्र, त्या दिवशी देशमुख सापडले नाहीत.

चौथी कारवाई: 6 ऑगस्ट 2021
6 ऑगस्ट रोजी ईडीने चौथ्यांदा कारवाई केली. ईडीने देशमुख यांच्या ट्रस्ट कार्यलयासह इतर दोन ठिकाणी आज कारवाई केली आहे.

पाचवी कारवाई : 17 सप्टेंबर 2021
अनिल देशमुख यांच्या घर-कार्यालयांवर आता आयकर विभागाने धाडी टाकल्या. अनिल देशमुख यांच्या नागपूर, मुंबई, तसंच त्यांच्या मालकीच्या कॉलेजवर आयकर विभागाने छापे ठाकले.

देशमुखांना आतापर्यंत चार समन्स
  1. पहिलं समन्स 25 जून रोजी
  2. दुसरं समन्स 26 जून रोजी
  3. तिसरं समन्स 5 जुलै रोजी
  4. चौथ समन्स 2 ऑगस्ट रोजी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here