Home Maharashtra भाजपचा इशारा । स्ट्रीटलाईट, पाणीपुरवठ्याचे वीजबील ग्रामपंचायतींना भरावे लागणार, निर्णय मागे घ्या...

भाजपचा इशारा । स्ट्रीटलाईट, पाणीपुरवठ्याचे वीजबील ग्रामपंचायतींना भरावे लागणार, निर्णय मागे घ्या अन्यथा रस्त्यावर उतरणार

481

नागपूर ब्युरो : गावातील पाणीपुरवठा आणि स्ट्रीट लाईटचे वीजबील ग्रामपंचायतीने भरावे असा निर्णय राज्य सरकारनं घेतला. बील न भरल्यास सरपंच आणि ग्रामसेवकावर कारवाई केली जाईल असे परिपत्रकही राज्य सरकारने काढलं आहे. सरकारच्या या निर्णयाचा भाजपने तसेच माजी उर्जीमंत्री चंदशेखर बावनकुळे यांनी निषेध केला आहे. तसेच हा निर्णय लवकरात लवकर परत घ्यावा अशी मागणीदेखील बावनकुळे यांनी केली. राज्य सरकारने हा निर्णय परत घेतला नाही, तर आगामी काळात भाजपकडून राज्यभर आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

पाणीपुरवठ्याचे वीजबील ग्रापं ला भरावे लागणार

मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारने वीजबिलासंदर्भात राज्य सरकारने नुकतेच एक परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार गावातील स्ट्रीट लाईट तसेच पाणीपुरवठ्याचे वीजबील ग्रामपंचायतीला भरावे लागणार आहे. तसेच हे बील न भरल्यास संबंधित ग्रामसवेक तसेच सरपंच यांच्यावर कारवाई केली जाईल, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आलंय. सरकारच्या याच निर्णयाविरोधात भाजपने दंड थोपटले आहेत. भाजप नेते आणि माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय राज्य सरकारने मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच राज्य सरकारने आमची मागणी मान्य केली नाही तर राज्यभर आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

निर्णयाचा फटका 27 हजार ग्रामपंचायतींना

तसेच पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले, 15 व्या वित्त आयोगाचा निधी राज्य शासनाला मिळाला आहे. ग्रामविकासासाठी निधी आला असताना तो इतरत्र वळता केला जातोय. राज्य सरकारच्या या निर्णयाचा फटका 27 हजार ग्रामपंचायतींना बसतोय. 50 टक्के गावं अंधारात आहेत. मागच्या 40 वर्षांपासून गावातील स्ट्रीट लाईटचं बील राज्य सरकार भरत होतं. मात्र, आता महाविकास आघाडी सरकारनं ते बंद केलंय. त्यामुळं हा निर्णय रद्द करावा. अन्यथा आंदोलन केले जाईल, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Previous articleRAFALE | जनवरी में भारत आएगा सबसे घातक लड़ाकू विमान, इजरायली और इंडियन टेक्नोलॉजी से लैस होगा 36वां राफेल
Next articleVIRAL VIDEO | फिल्मस्टार शाहरुख खान ने क्यों कहा कि अपनी सासू मां से लेनी पड़ेगी ट्यूशन?
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).