Home ganeshotsav Ganeshotsav 2021 | गणपती बाप्पा मोरया ने लाडक्या बाप्पाचे आगमन

Ganeshotsav 2021 | गणपती बाप्पा मोरया ने लाडक्या बाप्पाचे आगमन

662

आत्मनिर्भर खबर डॉट कॉम डेस्क: गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया च्या जयघोषात घरोघरी शुक्रवारी गणरायाचे आगमन झाले. गणरायाचे आगमन होताच विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. लाडक्या बाप्पाच्या आगमनामुळे सर्वत्र मंगलमय, आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा कोरोनाचे सावट असल्याने गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत आहे. गेल्याकाही दिवसांपासून राज्यभरात सुरू असलेला पावसाचा जोर आजही सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र, असे असले तरी नागरिकांनी बाप्पाच्या तयारीसाठीचे सामान खरेदी केली. अनेकांनी गुरूवारी रात्रीच तर काहींनी शुक्रवार च्या सकाळी च बाप्पा घरी आणला आणि सकाळी विधीवत प्रतिष्ठापना, पूजा केली.


मुख्यमंत्र्यांच्या “वर्षा” बंगल्यावर श्रीगणेशाची प्रतिष्ठापना

आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.

जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो, अशी प्रार्थना मी गणरायाच्या चरणी केली आहे. कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या संकटातून आपली मुक्तता व्हावी म्हणून आपण सर्वानी एक जबाबदार नागरिक म्हणून प्रयत्न करायला हवेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी श्री गणेशाची स्थापना

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी (नागपुरात) श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. ना. गडकरी यांनी गणेशाची स्थापना करून विधिवत पूजा केली.

याप्रसंगी सौ. कांचन गडकरी, मधुरा सारंग गडकरी, नातवंडे निनाद, अर्जुन, सानवी व नंदिनी गडकरी उपस्थित होते. गणेश चतुर्थीनिर्मित्त ना. नितीन गडकरी यांनी सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी बाप्पांचे आगमन

दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी बाप्पांचे आगमन झाले. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी श्री गणरायाच्या मूर्तीची सहकुटुंब प्राणप्रतिष्ठापना केली.

खासदार कृपाल तुमाने यांच्या घरी बाप्पाचे आगमन

रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने यांनी त्यांच्या सुभेदार ले-आऊट येथील घरी श्री गणेशाची स्थापना केली व समस्त रामटेकच्या जनतेला गणेशोत्वाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार कृपाल तुमाने यांच्या परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.

कोरोना पार्श्वभूमीवर हा उत्सव आला असल्यामुळे दरवेळी प्रमाणे गर्दी न करता कोरोना प्रोटोकॉल पाळत हा उत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी गणेश भक्तांना केले आहे. गर्दीच्या ठिकाणी कोरोना अधिक पसरू शकतो. त्यामुळे या काळात उत्सव साजरा करताना ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. सध्या आपण कठीण परिस्थितीतून जात आहोत परंतु. विघ्नहर्त्या श्रीगणेशाच्या आशीर्वादाने कोरोना सारख्या संकटातून आपण सर्व लवकरच बाहेर पडू व पुन्हा एकदा आपल्या सण उत्सवांना धुमधडाक्यात साजरे करू, अशा सदभावना त्यांनी व्यक्त केल्या.

Previous articleNagpur | सपनों का घर चाहिए तो जल्दी करें, खत्म हो रहा है पीएमएआई सब्सिडी का समय
Next articleRAFALE | जनवरी में भारत आएगा सबसे घातक लड़ाकू विमान, इजरायली और इंडियन टेक्नोलॉजी से लैस होगा 36वां राफेल
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).