Home Maharashtra चंद्रशेखर बावनकुळे। जावेद अख्तर यांनी तालिबानी अतिरेक्यांसोबत राहावे

चंद्रशेखर बावनकुळे। जावेद अख्तर यांनी तालिबानी अतिरेक्यांसोबत राहावे

503

नागपूर ब्यूरो : भाजप चे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रख्यात गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल केलेल्या विधानाचा निषेध केला आहे. अख्तर यांनी अफगाणिस्तान येथे जाऊन तालिबानी अतिरेक्यांसोबत राहावे म्हणजे त्यांना या अतिरेकी संघटनेबद्दल वस्तुस्थिती लक्षात येईल, असेही ते म्हणाले.

राष्ट्रीय स्वंयसेवक संघ ही संघटना देशप्रेमाची, सेवाभावाचे संस्कार रुजविणारे विद्यापीठ आहे. समाजातील शेवटच्या घटकाच्या, वंचितांच्या कल्याणासाठी काम करणारी ही संघटना आहे. जावेद अख्तर यांनी हे वादग्रस्त विधान मागे घावे, अशी मागणी सुद्धा भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.