Home हिंदी प्रतिदिवस 10 लाख लिटर दुधाची भुकटी बनविण्याच्या योजनेला मान्यता

प्रतिदिवस 10 लाख लिटर दुधाची भुकटी बनविण्याच्या योजनेला मान्यता

570

मुंबई : बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करतांना कोरोना टाळेबंदी काळात अतिरिक्त होणाऱ्या दुधा पैकी प्रतिदिवस 10 लाख लिटर दूध शासन खरेदी करून त्याद्वारे भुकटी बनविण्याच्या योजनेला ऑक्टोबर पर्यंत राबविण्याची मान्यता देण्यात आली. राज्याचे पशु संवर्धन व दुग्ध विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी ही माहिती दिली. 

राज्याचे पशु संवर्धन व दुग्ध विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार म्हणाले, कोणताही दूध उत्पादक शेतकरी हा सदैव सुफलाम राहावे हीच इच्छा आहे. महाविकास आघाडी शासन नेहमीच दुधउत्पादक शेतकऱ्यांचा पाठीशी खंबीरपणे उभी राहील.