Home मराठी चंद्रशेखर बावनकुळे । विजेचे गंभीर संकट : ‘सुसंवाद नसल्यामुळेच वीज कर्मचाऱ्यांचा संप’

चंद्रशेखर बावनकुळे । विजेचे गंभीर संकट : ‘सुसंवाद नसल्यामुळेच वीज कर्मचाऱ्यांचा संप’

राज्यात वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी पुकारलेल्या संपावर तोडगा काढण्यास ऊर्जा मंत्रालय अपयशी ठरत आहे. याचा थेट परिणाम वीजनिर्मितीवर होणार असून, उन्हाळ्याच्या तोंडावर सामान्यांना त्रास सहन करावा लागेल. ऊर्जा मंत्रालयाचा महावितरणच्या संचालक मंडळाशी सुसंवाद नाही म्हणूनच हा दिवस बघण्याची वेळ आली. ऊर्जा मंत्रालयाकडून नजीकच्या काळात विजेचे गंभीर संकट ओढवू शकते, कोळशाचा तुटवडा अशी विविध कारणे सांगितली जात आहेत असे, राज्याचे माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.

एकीकडे राज्यात वीज तोडणार नसल्याची घोषणा सभागृहात ऊर्जामंत्र्यानी केली. तरीही शेतकऱ्यांच्या दारी वीज बिलासाठी तगादा लावला जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथील शेतकऱ्याला वीज जोडणी न देता ४० हजारांचे वीज बिल पाठवण्यात आले.