Home मराठी पेट्रोल-डिझेलचा पुन्हा भडका, आजही दरांमध्ये 80 पैशांनी वाढ, मागील 9 दिवसांमध्येच 5.60...

पेट्रोल-डिझेलचा पुन्हा भडका, आजही दरांमध्ये 80 पैशांनी वाढ, मागील 9 दिवसांमध्येच 5.60 रुपयांनी महागले पेट्रोल

मागील 9 दिवसांत आज आठव्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. आज पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये 80 पैशांनी वाढ झाली आहे. नव्या दरानुसार मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लिटर 115.88 रुपयांवर तर डिझेल 100.10 रुपयांवर गेले आहे.

मार्चमध्ये यूपीसह 5 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या. या काळात म्हणजेच नोव्हेंबर ते मार्चदरम्यान कच्च्या तेलाच्या किमती 72.6 तब्बल टक्क्यांनी वाढल्या होत्या. तरीही निवडणुकांमुळे तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्या नव्हत्या. मात्र, 10 मार्चरोजी निवडणूक निकाल लागले. त्यानंतर मागील 12 दिवसांत कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असतानाही इंधनाच्या किमती मात्र वाढू लागल्या आहेत. मंगळवारी कच्च्या तेलाचे दर 6.79 टक्क्यांनी खाली येत 104.84 डॉलर/बॅरलवर आले. हे दर पूर्वीच्या सर्वोच्च पातळीपेक्षा 31% कमी आहे. तरीदेखील इंधनाचे दर मात्र सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे सामान्यांना महागाईची चांगलीच झळ बसत आहे.

आज पेट्रोलच्या दरात प्रति लिटर मागे 80 पैशांची तर डिझेलच्या दरातदेखील 80 पैशांची वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 115.04 रुपये तर डिझेल 99.25 रुपयांवर पोहोचले आहे. राज्यात सर्वाधिक दर परभणी जिल्ह्यात आहेत, परभणीत 118.09 रुपये प्रति लिटर इतका पेट्रोलचा दर आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल 115.69 आणि डिझेल 98.40 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 113.42 तर डिझेल 115.09 रुपये लिटर आहे. पुण्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर अनुक्रमे 114.71 आणि 97.46 रुपये इतके आहेत. तर उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोल 114.96 रुपये लिटर आणि डिझेल 97.73 रुपये लिटर इतके आहे.

कच्च्या तेलाच्या किमती त्यांच्या फेब्रुवारीच्या उच्चांकी 140 डॉलर प्रति बॅरलवरून 103 डॉलरवर घसरल्या आहेत. तरीही गेल्या नऊ दिवसांत तेल कंपन्यांनी आठवेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. तेल कंपन्यांचे हे धोरण पाहता भाववाढीचा हा क्रम पुढील 15 दिवस असाच सुरू राहण्याची शक्यता आहे.​​​​​​

जून 2010 पर्यंत सरकार पेट्रोलचे दर ठरवत असे आणि दर 15 दिवसांनी त्यात बदल होत असे. 26 जून 2010 नंतर सरकारने पेट्रोलचे दर ठरवण्याचे काम तेल कंपन्यांवर सोडले. त्याचप्रमाणे ऑक्टोबर 2014 पर्यंत डिझेलचे दरही सरकारने निश्चित केले होते.

19 ऑक्टोबर 2014 पासून सरकारने हे काम तेल कंपन्यांकडे सोपवले. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत, विनिमय दर, कर, पेट्रोल आणि डिझेलचा वाहतूक खर्च आणि इतर अनेक गोष्टी लक्षात घेऊन तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलची किंमत ठरवतात.

Previous articleचंद्रशेखर बावनकुळे । विजेचे गंभीर संकट : ‘सुसंवाद नसल्यामुळेच वीज कर्मचाऱ्यांचा संप’
Next article10 दिन में 9वीं बार बढ़े पेट्रोल-डीजल के दाम; चुनाव के बाद कुल 6.40 रुपए की बढ़ोतरी
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).