Home मराठी लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली; उपचाराला प्रतिसाद देत नसल्याची डॉक्टरांची माहिती

लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली; उपचाराला प्रतिसाद देत नसल्याची डॉक्टरांची माहिती

540

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली आहे. लता दिदी उपचाराला प्रतिसाद देत नाहीत. अशी माहिती ब्रीच कँडी रुग्णालयाच्या मेडिकल बुलेटीनमध्ये देण्यात आली आहे. काल लता मंगेशकर यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले होते. 8 जानेवारी रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून 92 वर्षीय लता दीदी आयसीयूमध्ये होत्या. रुग्णालयाबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत रुग्णालयाच्या डॉक्टरांशी विचारपुस केली. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन विचारपुस करणार आहे.

Previous articleउत्तरेतील हिमवृष्टीने राज्यात वाढली थंडी; निफाडला पुन्हा नीचांकी तापमान, पारा 5.5 अंशांवर
Next articleखासगी मेडिकल कॉलेजमध्ये 50% जागांवर सरकारी कॉलेजप्रमाणेच फी; एनएमसीचे नवे आदेश
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).