Home Fire Breaking News । जनरेटरमधील वायू गळतीने चंद्रपुरमध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Breaking News । जनरेटरमधील वायू गळतीने चंद्रपुरमध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

नागपूर ब्युरो : वीज नसल्यामुळे एसी चालवण्यासाठी लावलेल्या जनरेटरमधून झालेल्या कार्बन डायआॅक्साईडच्या गळतीने गुदमरून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना चंद्रपुरमधील दुर्गापूर भागात घडली. बहुतांश झोपडपट्टी असलेला हा भाग अजूनही मागास असून येथे वीज अभावानेच येत असल्याने अनेक कुटुंब जनरेटरचा वापर करतात. चंद्रपूर शहरालगतच्या दुर्गापूर येथील कंत्राटदार रमेश लष्कर यांच्या कुटुंबानेही रात्री वीज नसल्याने जनरेटरवर एसी लावला.

सध्या पावसाने दडी मारल्याने पूर्व विदर्भात असह्य उकाडा आणि गर्मी आहे. त्यातच वीज नसली की, अंगातून घामाच्या धारा वाहतात. या गर्मीपासून वाचण्यासाठी रमेेश लष्कर यांनी 12 जुलैच्या रात्री जनरेटरवर एसी लावला. मात्र घराच्या दरवाजे व खिडक्या बंद असल्याने जनरेटरमधून धूर निघाला. एसीत निघालेला धूर संपूर्ण घरभर पसरल्याने लष्कर यांच्या कुटुंबातील सहा जणांचा झाेपेतच गुदमरून मृत्यू जाला. तर एक जणाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.

लष्कर यांच्या घरातून धूर निघत असल्याचे दिसताच परिसरातील लोकांनी आरडाओरडा करीत पोलिसांना सूचना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी लष्कर यांच्या घराचा दरवाजा तोडून घरातील सदस्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. मात्र तिथे डाॅक्टरांनी तपासून सहा जणांना मृत घोषीत केले. मृतांमध्ये अजय लष्कर (21), रमेश लष्कर (45), लखन लष्कर (10), कृष्णा लष्कर (8), पूजा लष्कर (14), माधुरी लष्कर (20) यांचा समावेश आहे. दहा दिवसांपूर्वी या कुटुंबात विवाह झाला होता. त्या नंतर ही दुदैवी घटना झाल्याने दुर्गापुरात शोककळा पसरली आहे.

Previous articlePolitics | रजनीकांत ने अपने राजनीतिक संगठन ‘रजनी मक्कल मंद्रम’ को किया भंग
Next articleMaharashtra । मराठा आरक्षणासंदर्भात उद्धव ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).