Home मराठी Maharashtra । माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बंगल्यावर ईडी चा छापा

Maharashtra । माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बंगल्यावर ईडी चा छापा

नागपुर/मुंबई ब्यूरो : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबई येथील बंगल्यावर ईडी ने छापा मारला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर सदर कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.

नागपूर येथील अनिल देशमुख यांच्या बंगल्यावर सकाळपासून मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. यादरम्यान ईडी च्या चमूने त्यांच्यावर कारवाई सुरू केली. हाती आलेल्या माहितीनुसार अनिल देशमुख यांच्या नागपूर सह मुंबई येथील बंगल्यावर सुद्धा छापा मारण्यात आला आहे.