नागपूर ब्यूरो: जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त 5 जुन 2021 रोजी दुपारी 12 वाजता पर्यावरण व निसर्ग संस्था नागपूरच्यावतीने साजरा करण्यासाठी पर्यावरण व निसर्ग प्रेमी वेबीनारचे माध्यमातून एकत्र येणार आहेत. या वर्षीचे घोषवाक्य परिसंस्था पुनरसंचयन ( Ecosystem Restoration), या विषयावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नागपूरचे प्रादेशिक अधिकारी अशोक करे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पर्यावरण व निसर्ग संस्था, मुंबईचे अध्यक्ष डी.ए. खरड राहणार आहेत. कार्यक्रमाचे संचालन संस्थेचे सचिव मधुकर सुरवाडे करणार आहेत. संस्थेचे कोषाध्यक्ष राजेश सोनटक्के यांनी ही माहिती दिली आहे.