Home Health Nagpur । 180 निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर, मेयो रुग्णालयात रुग्णसेवेवर परिणाम

Nagpur । 180 निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर, मेयो रुग्णालयात रुग्णसेवेवर परिणाम

नागपूर ब्युरो : सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे निर्बंध शिथील करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलाय. नागपूरमध्येही कोविड सेंटर्समधील अनेक बेड रिकामे आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करुन नागपूरच्या मेयो रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आम्हाला नॉन कोविड रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी द्यावी अशी मागणी केली आहे. या मागणीला घेऊन हे डॉक्टर्स मागील दोन दिवसांपासून सामूहिक रजेवर आहेत. डॉक्टरांच्या सामूहिक रजेचा आजचा तिसरा दिवस आहे.

डॉक्टर दोन दिवसांपासून सामूहिक रजेवर

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे अनेकांनी शुकटेचा निश्वास सोडला आहे. या कालावधीदरम्यान मागील कित्येक महिन्यांपासून नागपूरच्या मेयो रुग्णालयातील निवासी डॉक्टरांवर कोविड रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी देण्यात आली. मात्र, आता रुग्णसंख्या कमी झाली आहे, त्यामुळे आतातरी नॉन कोविड रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी द्यावी, अशी मागणी येथील निवासी डॉक्टरांनी केली आहे. याच मागणीसाठी मेयो रुग्णालयातील डॉक्टर्स सामूहिक रजेवर आहेत. मागील दोन दिवसांपासून डॉक्टर रजेवर आहेत. रजेवर असणाऱ्या डॉक्टर्सची एकूण संख्या 180 च्या घरात आहे.

रजेमुळे रुग्णसेवेवर परिणाम

दरम्यान, मेयो रुग्णालयातील एकूण 180 डॉक्टर्स रजेवर असल्यामुळे येथे रुग्णसेवेवर परिणाम झाल्याचे जाणवते आहे. याच कारणामुळे डॉक्टरांच्या मागण्यांवर गंभीरपणे विचार करुन तो लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी केली जात आहे.