Home कोरोना कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना मोफत अंडी -फळे वितरण

कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना मोफत अंडी -फळे वितरण

नागपूर ब्यूरो: सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून कोविड -१९ या जागतिक महामारीमुळे सगळेच या संकटाचा सामना करताहेत, त्यातून गरीब – श्रीमंत कुणीच सुटलेले नाहीत. त्याहूनही अधिक समाजातील अति दुर्बल घटक व दारिद्र रेषेखालील ( बीपीएल ) रुग्णांची परिस्थिती फार बिकट आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी या संकटातून सुखरूप बाहेर पडावे या उदात्त भावनेतून बेसा – बेलतरोडीतील एक शिक्षकी पेशेतील तरुण सामाजिक कार्यकर्ता धनराज प्रेमराज बडोले व त्यांच्या मातोश्री मालन प्रेमराज बडोले यांच्या सहकार्याने परिसरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी १ ते १० मे पर्यंत, सकाळी ९ ते १०:३० या वेळेत प्लॉट क्र.२३७, उन्नती पार्क, बेसा पेट्रोल पंपसमोर अंडी, फळे, मास्क,सॅनिटायझर यांचे नि :शुल्क वितरण करण्यात येत आहे.
तसेच बीपीएल व गरजूसाठी सकाळी दहा ते साडेदहा आणि सायंकाळी सात ते साडेसात या वेळेत टिफिन सेवा उपलब्ध आहे.कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संक्रमित न झालेल्या नातेवाईकांनी या सेवेचा शासनाने दिलेल्या गाईड लाईन्सचे तसेच सोशल डिस्टंसिन्ग पाळून लाभ घ्यावा. येतांना रुग्णाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट सोबत आणावे, दिव्यांग व वृद्धांना प्राधान्य दिले जाईल. अधिक माहितीसाठी ९७६७८७४८५३ /८९९९७०६४७५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आयोजकांनी पत्रकात म्हटले आहे.

Previous articleन्यूज एंकर रोहित सरदाना का हार्ट अटैक से निधन, कोरोना से भी थे संक्रमित
Next articleदिल्ली के अस्पताल में ऑक्सीजन खत्म होने से 12 कोरोना मरीजों की मौत
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).