Home मराठी NAGPUR | आता ऑलम्पिकची तयारी : अल्फिया 

NAGPUR | आता ऑलम्पिकची तयारी : अल्फिया 

1000

महिला बॉक्सर अल्फिया पठाणचे नागपूर नगरीत जंगी स्वागत

नागपूर ब्यूरो: पोलंडच्या किलसेमध्ये सुरु असलेल्या विश्व चॅम्पियनशीपमध्ये भारताकडून नागपूरच्या महिला बॉक्सर अल्फिया पठाण हिने सुवर्णपदक पटकावून देशाचे आणि नागपूर नगरीचे नांव उंचावले आहे. आज दिल्ली येथून रेल्वेने तिचे नागपूर रेल्वेस्थानकावर आगमन झाले. या आगमनप्रसंगी नागपूर नगरीचे प्रथम नागरिक महापौर दयाशंकर तिवारी, मनपा क्रीडा समितीचे सभापती प्रमोद तभाने यांनी अल्फिया पठाण हिचे पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले.

पत्रकारांशी बोलताना अल्फिया पठाण यांनी सांगितले की, या यशाचे श्रेय वडील, आई, भाऊ आणि प्रशिक्षक गणेश सर यांना जाते. यानंतर ती वर्ष 2024 ला होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेसाठी तयारी करणार आहे. त्यांनी नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांचे आभार मानले तसेच नागपूर बॉक्सिंग असोसिएशन यांच्याप्रतीसुद्धा आभार व्यक्त केले. याप्रसंगी बोलताना अल्फिया म्हणाली, पोलंडच्या खेडाळूसोबत झालेली उपांत्यफेरी फारच कठीण होती. मात्र, उत्तम सराव आणि जिद्दीच्या भरवशावर ही फेरी लिलया पार केली. अल्फियाचे प्रशिक्षक गणेश पुरोहित यांनी सांगितले की, सगळे सामने फार आव्हानात्मक होते. अल्फिया हिने मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर हे सामने जिंकले.

महापौर दयाशंकर तिवारी यांनी अल्फिया पठाणचे अभिनंदन केले. ते म्हणाले, नागपुरातून बॉक्सिंगची प्रॅक्टिस करणारी अल्फिया पठाण यांनी सुवर्ण पदक जिंकून संपूर्ण जगात नागपूरचा नावलौकिक वाढविला आहे. आता ती ऑलम्पिकमध्ये पदक पटकावेल, अशी मी आशा बाळगतो. यावेळी अल्फिया चे बॉक्सींग प्रशिक्षक गणेश पुरोहित आणि अल्फिया पठाणचे वडील अक्रमखान पठाण यांचेसुध्दा स्वागत व अभिनंदन करण्यात आले. या प्रसंगी मनपा क्रीडा विभागाचे नियंत्रण अधिकारी नितीन भोळे, क्रीडा अधिकारी पियुष अंबुलकर उपस्थित होते.

Previous articleNAGPUR | 20 मेट्रीक टनचा ऑक्सिजन टँकर नागपुरात पोहोचला
Next articleNagpur | कोविड रूग्णांना दिले 25 हजार रुपये
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).