Home Health Nagpur | दिघोरी परिसरात 20 बेडचे कोविड केअर सेंटर

Nagpur | दिघोरी परिसरात 20 बेडचे कोविड केअर सेंटर

नागपूर ब्यूरो: प्रभाग क्र.28 मधील नरसाळा रोड दिघोरी येथील रामलीला लॉन येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. त्याचे उदघाटन मनपा स्थायी समितीचे माजी सभापती विजय  (पिंटू) झलके यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी कोव्हिड केअर सेंटरचे प्रमुख व महाराष्ट्र कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. मनीष पाटील, रामलीला लॉनचे संचालक पंकज चकोले, दीपक चकोले, अनंता बावीस्कर, सचिन नंदरधने यांच्यासह डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. या कोव्हिड केअर सेंटरची क्षमता 20 खाटांची असून यात प्रामुख्याने सौम्य व अति सौम्य लक्षणे असलेले, ज्यांचा सीटी  स्कोर 10 पेक्षा कमी आहे व ज्यांची ऑक्सिजन लेव्हल 94 पेक्षा अधिक आहे केवळ अशाच कोव्हिड रुग्णांना प्रवेश मिळणार आहे.

शहरातील एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता या कोव्हिड केअर सेंटरचा फायदा नागरिकांना व्हावा यासाठी डॉ मनीष पाटील यांनी माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक पिंटू झलके यांच्या सहकार्याने कोव्हिड केअर सेंटर सुरू केले. कोव्हिडचा वाढता प्रकोप लक्षात घेता नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप इत्यादी लक्षणे दिसताच लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन नगरसेवक पिंटू झलके यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here