Home Maharashtra Maharashtra । तुलना केवळ परिस्थितीशी नको,सरकारच्या कृतीशीही व्हावी- देवेंद्र फडणवीस

Maharashtra । तुलना केवळ परिस्थितीशी नको,सरकारच्या कृतीशीही व्हावी- देवेंद्र फडणवीस

मुंबई ब्युरो : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांशी संवाद साधल्यानंतर विरोधकांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी आपल्या भाषणात मांडलेल्या अनेक मुद्द्यांवरुन या पक्षांनी नाराजी वर्तवली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर तीव्र टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करीत आपली नाराजी व्यक्त केली. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं की, बेल्जियमने परत लॉकडाऊन केलाय… पण, 20 बिलियन युरोचे पॅकेज जाहीर केलंय… पोर्तुगाल सरकारने नागरिकांची ये-जा थांबविली आहे… पण, 13 बिलियन युरोचे पॅकेज मार्च 2020 मध्येच जाहीर केलं आहे.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणतात, ” फ्रान्सने तिसर्‍यांदा लॉकडाऊन लावला…पण, 120 अब्ज डॉलर्सचे विविध उपाय हाती घेतले. हंगेरीत ‘वर्क फ्रॉम होम’… पण, युरोपियन युनियनमध्ये भांडून हक्काचा निधी पदरी पाडून घेतला. डेन्मार्कमध्येही तीच परिस्थिती…पण, एप्रिल 2020 मध्येच सर्वच घटकांना पॅकेज. ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध उठण्यास मदत…पण, 2,20,000 उद्योग आणि 6 लाखांवर कर्मचार्‍यांना मदत. एवढेच नाही तर वेतन न मिळणार्‍यांना 800 युरोंपर्यंत मदत. पोर्तुगाल सरकारने नागरिकांची ये-जा थांबविली आहे…पण, 13 बिलियन युरोचे पॅकेज मार्च 2020 मध्येच जाहीर केले. आयर्लंडमध्ये डिसेंबरपासून कडक निर्बंध आहेत…पण, 7.4 बिलियन युरोंचे पॅकेज ऑक्टोबरमध्येच दिलंय. फिलिपाईन्समध्ये कडक निर्बंध आहेत… पण, 3.4 बिलियन डॉलर्सचे पॅकेज सप्टेंबरमध्येच दिलंय. युके,जर्मनी कुठेही जा,सर्वांनीच काही ना काही दिलंय… तुलना केवळ परिस्थितीशी नको,सरकारच्या कृतीशीही व्हावी,एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा.”

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विट मध्ये हे देखील म्हटले आहे कि विरोधक वा तज्ञांचा दु:स्वास करून नाही,तर आपण प्रत्यक्ष काय करतो,याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबविण्यात अधिक मदत करेल. ते म्हणाले होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत…आणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एक व्हिडिओ शेअर करीत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी वाढत्या कोरोनाच्या बाबतीत ठोस उपाययोजना सांगण्याऐवजी पुन्हा एकदा ‘प्रबोधनात्मक’ संवाद साधला. एका बाजूला इतर राज्याचं मला सांगू नका असं बोलत असताना जगभराची आकडेवारी देण्यामागील प्रयोजन कळलं नाही.

Previous articleMaharashtra । मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊनचा इशारा, दोन दिवसांत घेणार निर्णय
Next articleखबर अच्छी हैं | बेसहारा बहनों के लिए अभिभावक बन गई गडचिरोली पुलिस, जवान और अधिकारियों ने की मदद
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).