Home Bollywood Corona Virus | अभिनेत्री आलिया भट्टला कोरोनाची लागण

Corona Virus | अभिनेत्री आलिया भट्टला कोरोनाची लागण

मुंबई ब्युरो : राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसत आहे. दिवसागणिक राज्यातील कोरोना बाधितांचाही आकडा वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक बॉलिवूडकरांनाही कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. रणबीर कपूर, संजय लीला भंसाळी, मनोज बाजपेयी आणि आता या यादीत आलिया भट्टच्या नावाचाही समावेश झाला आहे. आलियालाही कोरोनाची लागण झाली आहे.

 

आलियाने सोशल मीडियावर पोस्ट केले की, “माझी कोविड-19 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तिने स्वत:ला होम क्वारंटाईन केले आहे आणि आणि सर्व नियमांचं पालन करत आहेत. तुम्हा सर्वांच्या काळजीबद्दल आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद”

काही दिवसांपूर्वीच अभिनेता रणबीर कपूरचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता रणबीर कपूर बरा झाला असून त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. रणबीर बरा झाल्यानंतर आलिया रणबीरसोबत जुहू येथे दिसली होती. रणबीर आणि आलिया ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटात प्रथमच एकत्र दिसणार आहेत. आलिया आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून या चित्रपटाबद्दलच्या पोस्ट्स कायम शेअर करत असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here