Home Maharashtra Bollywood । बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानला कोरोनाची लागण

Bollywood । बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानला कोरोनाची लागण

मुंबई ब्युरो : बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानला कोरोनाची लागण झाली आहे. आमिर खानच्या टीमने ही माहिती दिली आहे. सध्या आमिर खानने स्वत:ला होम क्वॉरंटाईन केलं आहे.

आमिर खानच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, “आमिर खानची कोविड -19 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तो सध्या आपल्या घरी होम-क्वॉरंटाईनमध्ये आहे आणि सर्व नियमांचे पालन करत आहे. आमिरची तब्येत ठीक आहे. नुकतेच आमिरच्या संपर्कात जे आले असतील त्यांनी खबरदारी म्हणून त्यांची कोविड 19 चाचणी करून घ्यावी. आपल्या सदिच्छांबद्दल सर्वांचे आभार.”

गेल्यावर्षी आमिरच्या घरातील सात कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. या सात कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षारक्षक, ड्रायव्हर, घरात काम करणारे नोकर यांचा समावेश होता. काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूर, संजय लीला भन्साळी, कार्तिक आर्यन, वरुण धवन, नीतू सिंह यांसारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींनाही कोरोनाची लागण झाली होती.

आमिर खानने 14 मार्च रोजी आपला 56 वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी आमिरने सोशल मीडिया सोडण्याची घोषणा केली होती. अलीकडेच तो ‘कोई जाने ना’ चित्रपटाच्या ‘हर फन मौला’ या गाण्यात दिसला होता. या गाण्यात तो अली अवरामसोबत डान्स करताना दिसला होता.

याशिवाय आमिर खान आगामी ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 24 डिसेंबर 2021 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी ख्रिसमसमध्ये प्रदर्शित होणार होता पण कोरोना साथीमुळे ती तारीख पुढे ढकलली गेली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here