Home Maharashtra परमबीर सिंग प्रकरणामुळे राष्ट्रवादीत खळबळ, पवारांनी दिल्लीत बोलावली बैठक

परमबीर सिंग प्रकरणामुळे राष्ट्रवादीत खळबळ, पवारांनी दिल्लीत बोलावली बैठक

मुंबई ब्युरो : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली असून दिल्लीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे.

शरद पवार हे दिल्लीच्या दौऱ्यावर आहे. परमबीर सिंग पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. त्यामुळे शरद पवार यांनी दिल्लीतच राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि जयंत पाटील यांना दिल्लीतच बैठकीसाठी बोलावून घेतले आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपासंदर्भात बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. गृहमंत्रिपद बदलण्यावर देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते या बैठकीत सहभागी होणार असून आज सायंकाळी 7 वाजता ही बैठक होणार आहे.

तसंच झालेल्याया प्रकारानंतर शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पाठवलेल्या पत्रासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहितीसमोर आली आहे. माजी पोलीस आयुक्त यांनी गंभीर आरोप देशमुख यांच्यावर केले आहे. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाची भूमिका आणि पुढील भूमिका यावर शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

Previous articleNagpur | …तो इस्तीफे का दौर दिल्ली से शुरू होना चाहिए – फैजान मिर्ज़ा
Next articleMPSC EXAM । एमपीएससी परीक्षार्थींना नाकाबंदी पॉईंट वर कसलाही त्रास होणार नाही
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).