नागपूरच्या पोलीस उपायुक्त विनिता साहू यांच्या पोलिसांना सूचना
नागपूर ब्युरो : शहराच्या पोलीस उपायुक्त विनिता साहू यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेकरिता शहरात येणाऱ्या परीक्षार्थींना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. सध्या नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे लॉकडाऊन लागलेली आहे. यामुळे ठीक – ठिकाणी पोलिसांतर्फे नाकाबंदी सुद्धा करण्यात आली आहे.
यामुळे परीक्षा त्यांना त्रास होऊ नये या दृष्टीने त्यांनी या सूचना केल्या आहेत. त्यांनी परीक्षार्थींना म्हटले आहे की आपले ओळखपत्र सोबत बाळगा. नाकाबंदी पॉईंटवर जे पोलीस तैनात असतील त्यांना ते दाखवा. त्यामुळे कुठेही त्यांची अडवणूक होणार नाही आणि परीक्षार्थी वेळेत आपल्या परीक्षा केंद्रांवर पोहोचू शकतील.
पालकांना सुद्धा रोकु नका
त्या म्हणाल्या शहरातील सर्व नाकाबंदी पॉईंट ला आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलं आहे की एमपीएससी परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांना कोणताहि त्रास होऊ नये त्याची खबरदारी घ्यावी.