Home हिंदी गणेशोत्सव : पूजनानंतर म्हणा गणपतीच्या या प्रसिद्ध आरत्या

गणेशोत्सव : पूजनानंतर म्हणा गणपतीच्या या प्रसिद्ध आरत्या

आता आपल्या सर्वांनाच वेध लागले आहे ते गणपती आगमनाचे. उत्साह, चैतन्याने भारलेल्या वातावरणात गणपतीची अगदी विधिवत पूजा केली जाते. यंदा शनिवार, 22 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. गणेश पूजन झाल्यानंतर आपल्याकडे आरत्या म्हणायची परंपरा आहे. गणेश चतुर्थीनिमित्त गणपतीच्या काही आरत्या खास ‘आत्मनिर्भर खबर डॉट कॉम’ च्या वाचकांसाठी…

  • सुखकर्ता दुःखहर्ता

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥1॥

जय देव, जय देव जय मंगलमूर्ती। दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुमकुम केशरा ।।

हिरेजडित मुकुट शोभतो बरा । रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया ॥2॥

॥ जय देव जय देव०॥

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।।
दास रामाचा वाट पाहे सदना । संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना ॥3॥


  • शेंदूर लाल चढाओ

शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुखको । दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहरको ।

हाथ लिए गुडलद्दु सांई सुरवरको । महिमा कहे न जाय लागत हूं पादको ॥1॥

जय जय श्री गणराज विद्या सुखदाता
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता, जय देव जय देव ॥ध्रु०॥

अष्टौ सिद्धि दासी संकटको बैरि । विघ्नविनाशन मंगल मूरत अधिकारी ।

कोटीसूरजप्रकाश ऐबी छबि तेरी । गंडस्थलमदमस्तक झूले शशिबिहारि ॥2॥

॥ जय देव जय देव०॥

भावभगत से कोई शरणागत आवे । संतत संपत सबही भरपूर पावे ।
ऐसे तुम महाराज मोको अति भावे । गोसावीनंदन निशिदिन गुन गावे ॥3॥


  • प्रार्थना

घालीन लोटांगण वंदीन चरण । डोळ्यांनी पाहिन रूप तुझे ।
प्रेमें आलिंगीन आनंद पूजन । भावे ओवाळिन म्हणे नामा ।।

त्वमेव माता पिता त्वमेव । त्वमेव बन्धु: सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव । त्वमेव सर्वं मम देवदेव ।।

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा । बुध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् ।

करमि यद्यत् सकलं परस्मै । नारायणायेती समर्पयामि ।।

अच्युतं केशवं राम नारायणम् कृष्णदामोदरं वासुदेवं भजे।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम् जानकीनायकं रामचंद्र भजे ।।

हरे राम हरे राम राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।।


घरीच साजरा करा उत्सव
यंदा कोरोना च्या संसर्गाची भीती असल्यामुळे शासनाने सर्वांना सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन न करण्याची अपील केली आहे. सर्वांनी महामारी बघता या वर्षी आपल्या घरीच राहून गणेशाची आराधना करावी. आपण सर्व जण मिळून प्रार्थना करूया आमच्या आयुष्यातील हे कोरोना चे विघ्न दूर होऊ दे माझ्या लाडक्या गणराया.

– विदिशा दिलीप सुर्वे, मॉडल

14 COMMENTS

  1. May Lord Ganesha destroy all your worries, sorrows and tensions and fill your life with love and happiness. Happy Ganesh Chaturthi!
    Miss super model vidisha surve…

  2. !!!!❤🙏 गणेशचतुर्थीच्या आपणास व तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा❤🥰🙏!!!!बाप्पा तुमच्या सर्व इच्छा आशा पूर्ण करो 😇❤🙏 !!!!
    🙏!!!!गणपती बाप्पा मोरया!!!!🙏मंगलमूर्ती मोरया!!!❤

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here