Home हिंदी श्री गणेश मंदिर टेकडी ला अ पर्यटन क्षेत्राचा दर्जा द्या : भूषण...

श्री गणेश मंदिर टेकडी ला अ पर्यटन क्षेत्राचा दर्जा द्या : भूषण दड़वे

963
सामाजिक कार्यकर्ता आणि भाजपा नागपूर शहर उपाध्यक्ष भूषण दड़वे

नागपूर : शनिवार 22 ऑगस्ट ला श्री गणेश चतूथीॅ आहे या मूहर्तावर नागपूरच्या श्री गणेश मंदिर टेकडी ला अ पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्यासाठी शासनाने घोषणा करावी अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 30 महिन्यांपासून हां प्रस्ताव धूळ खात पड़ला आहे. असा आरोप सामाजिक कार्यकर्ता आणि भाजपा नागपूर शहर उपाध्यक्ष भूषण दड़वे यांनी केला आहे.

भूषण दड़वे म्हणतात, आम्ही दिनांक 30/1/2013 पासून सतत संघर्ष करून पाठपुरावा करून लढा देत आहोत. शासन निर्णय प्रमाणे सर्व त्रूटया दूर करून दिनांक 17/3/2018 ला जिल्हाधिकारी नागपूर यांनी प्रधान सचिव पर्यटन विभागाला प्रस्ताव पाठविला आहे. त्याला ही 30 महीने झाले तरी आजपावेतो न्याय मिळाला नाही. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, विधानसभा सभापती नाना पटोले, नागपूर चे पालकमंत्री डाॅ. नितीन राऊत, तत्कालीन मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अनिल देशमुख, मंत्री सुनील केदार, विजय वडेट्टीवार, प्रधान सचिव पर्यटन यांनी त्वरीत दखल घेऊन कॅबिनेट मिंटीग मध्ये प्रस्ताव व ठराव पास करून जी आर काढण्याची मागणी केली जात आहे.