Home कोरोना Nagpur | नागपुरात पुन्हा लॉकडाऊन म्हणजे शुद्ध वेडेपणा : संदीप जोशी

Nagpur | नागपुरात पुन्हा लॉकडाऊन म्हणजे शुद्ध वेडेपणा : संदीप जोशी

नागपूर ब्युरो : नागपुरात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. ते नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने कठोर प्रयत्न करण्याऐवजी पालकमंत्र्यानी लॉकडाऊन घोषित केला. हा निर्णय म्हणजे शुध्द वेडेपणा असल्याची प्रतिक्रिया माजी महापौर संदीप जोशी यांनी नोंदविली आहे.

ते पुढे म्हणाले, गोरगरीब जनता, मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय आणि नियम पाळणाºयांसाठी हा पालकमंत्र्यांनी घेतलेला निर्णय अत्यंत क्लेशदायक आहे. कडक कायदे करून, जनजागृती करून नागरिकांना नियम पाळण्यास बाध्य करून रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविता आले असते. मात्र आपले अपयश झाकण्यासाठी सामान्यांवर लॉकडाऊन लादणे, हे चुकीचे पाऊल आहे. याचा आपण निषेध करतो, असेही माजी महापौर संदीप जोशी यांनी म्हटले आहे.

Previous articleMPSC Exam | परीक्षा आठवड्याभरात होईल, आज परीक्षेची तारीख जाहीर होईल : मुख्यमंत्री
Next articleMaharashtra । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली कोरोनावरची लस
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).