Home हिंदी मी एकनाथ शिंदे बोलतोय । जखमी जवानाशी थेट फोन वर केली प्रकृतीची...

मी एकनाथ शिंदे बोलतोय । जखमी जवानाशी थेट फोन वर केली प्रकृतीची विचारपूस

गडचिरोली ब्युरो : गडचिरोली पोलिसांनी नुकतेच जंगलात घुसून नक्षलवाद्यांचे तळ उध्वस्त केले. या कारवाईत गडचिरोली पोलिसांचा मोहन उसेंडी नावाचा जवान जखमी झाला. त्याला उपचाराकरिता नागपूरच्या एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. दरम्यान त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गडचिरोलीचे पालकमंत्री आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी मोबाईल वरून सदर जवानाशी बातचीत केली.

यावेळी एकनाथ शिंदे जवानाला म्हणाले, ” तुमची तब्येत कशी आहे. जखमा कुठे आहेत, उपचार कसा सुरु आहे.” ख्य म्हणजे यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर जवानाचे नक्षलवाद्यांच्या विरोधात यशस्वी ऑपरेशन करिता अभिनंदन सुद्धा केले. ते म्हणाले मी तुमच्या जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षकांशी सुद्धा बोललोय. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. काही लागलं, गरज भासली की मला सांगा. गडचिरोलीला आलो की तुमची भेट घेतो.

Previous articleशेतकरी, महिला, युवावर्ग तथा दुर्बल घटकांचा विकास साधणारा अर्थसंकल्प : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
Next articleAkola । गीतांजली एक्सप्रेसचा डबा रुळावरून घसरला
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).