Home मराठी Akola । गीतांजली एक्सप्रेसचा डबा रुळावरून घसरला

Akola । गीतांजली एक्सप्रेसचा डबा रुळावरून घसरला

अकोला ब्युरो : बोरगाव मंजू ते काटेपूर्णा दरम्यान हावडा -मुंबई गीतांजलि एक्सप्रेस चा एक डबा रुळावरून घसरल्याची घटना मंगळवारी सकाळी 11.15 वाजता च्या सुमारास घडली.

दरम्यान या अपघातामुळे अप व डाऊन लाईन वरची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. हावडा वरून मुंबईकडे जाणारी ही विशेष गाडी काटेपूर्णा ते बोरगाव मंजू रेल्वे स्थानकादरम्यान आली असता या गाडी चा शेवटचा डब्बा अचानक रूळावरून घसरला.

डबा घसरताच गाडी थांबली प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली घसरलेला डबा रुळावरून बाजूला करण्याचे कार्य करण्यात आले

हाती आलेल्या माहितीनुसार गीतांजलि एक्सप्रेस चे डबे रुळावरून घसरले असले तरी एक्सप्रेस मध्ये प्रवास करणारे सर्व प्रवासी सध्या सुरक्षित असल्याची माहिती मिळते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here