Home मराठी Nagpur । काळे दुपट्टे घालून भाजप नेत्यांनी केले सरकार विरोधात आंदोलन

Nagpur । काळे दुपट्टे घालून भाजप नेत्यांनी केले सरकार विरोधात आंदोलन

नागपूर ब्युरो : ओबीसी आरक्षण आणि विभिन्न मुद्द्यांना घेऊन सोमवारी नागपूर येथील संविधान चौकात भाजप नेत्यांनी काळे दुपट्टे घालून आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे प्रदेश महामंत्री तसेच माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले कि महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजावर अन्याय कारक भूमिका स्वीकारलेली आहे परवा सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आला त्या निकालांमध्ये प्रचंड मोठा अन्याय ओबीसी समाजावर झाला. 15 महिन्यापासून महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टाकडे बाजूच मांडली नाही सुप्रीम कोर्टाकडे डाटा सबमिट केला नाही. म्हणून हा निकाल आला. ओबीसी समाजाची जिल्ह्यावार काय स्थिती आहे ती कळविली नाही आणि म्हणून हा निकाल आला.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, 96 सीट जिल्हा परिषदेच्या कमी होणार आहे. दोनशेच्यावर पंचायत समित्या कमी होणार आहे. पाच हजाराच्या वर ग्रामपंचायत च्या सरपंच ला फटका बसणार आहे महानगरपालिका नगरपालिका फटका बसणार आहे. आम्ही काळे दुपट्टे लावून आंदोलन करीत आहोत. आमची मागणी आहे की सरकारने पुन्हा सुप्रीम कोर्टात जावे, उत्तर लावावे आणि सुप्रीम कोर्टाकडे डाटा मांडावा. जर हे सरकार ने केले नाही तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करू.