Home Education JEE Main Results । जेईई मेन फेब्रुवारी 2021 सत्राचा निकाल आज जाहीर...

JEE Main Results । जेईई मेन फेब्रुवारी 2021 सत्राचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता

जेईई मेन फेब्रुवारी 2021 सत्राचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर एनटीएच्या (NTA) http://ntaresults.nic.in/resultservices/JEEMainP2-Apr20-auth या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थी निकाल पाहू शकणार आहेत.

देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर जेईई मेन परीक्षा 23 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान घेण्यात आली होती. तर मार्च सत्राची परीक्षा देशभरात 15 मार्च ते 18 मार्च दरम्यान घेतली जाणार आहे. या परीक्षेची ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची तारीख 6 मार्चपर्यंत होती.

जेईई मेन (JEE Main) निकाल असा बघा
  1. सर्वात आधी एनटीए च्या jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
  2. ‘JEE Main result 2020’ या लिंकवर क्लिक करा.
  3. जेईई मेन लॉग इन तपशील भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
  4. निकाल पाहण्यासाठी तुम्ही अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाकून क्लिक करा.
  5. NTA जेईई मुख्य निकाल आपल्या स्क्रीनवर दिसेल
  6. निकालाचे प्रिंटआउट घ्या.
  7. एनटीए पर्सेंटाइल स्कोअर, ऑल इंडिया रँक आणि जेईई मेन कटऑफ याविषयीही माहिती निकालामध्ये असणार आहे.
आयआयटी, एनआयटी या संस्थांमध्ये प्रवेश परीक्षा

जेईई मेनची परीक्षा देशातील विविध आयआयटी, एनआयटी आणि केंद्रीय विद्यापीठांमधील बी-टेक कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली जाते. या परीक्षेअंतर्गत 2 पेपर घेण्यात आले आहेत. पहिला पेपर -1 त्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येते, ज्यांना आयआयटी, एनआयटी आणि केंद्रीय विद्यापीठांमध्ये बी-टेकमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. आर्किटेक्चर आणि नियोजन अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दुसरा पेपर आयोजित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here